Share

शिंदे गटाने पकडली ठाकरेंची ‘ती’ मोठी चूक, निवडणूक आयोगापुढे सादर करणार पुरावे

निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळण्यासाठी जो अर्ज केला. त्यावर निवडणूक आयोगाचा निर्णय अजून बाकी आहे. मात्र त्याआधीच शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल, असा ठामपणे दावा केला जात असल्याचे दिसते. (Shinde group caught Thackeray’s ‘that’ big mistake, will submit evidence before Election Commission)

शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधी मंडळातील २८२ सदस्यांपैकी १७० जणांचे शिंदे गटाला समर्थन आहे. ही शिंदे गटाची जमेची बाजू आहे. तर शिवसेना पक्ष घटनेच्या दुप्पट नियुक्त्या पक्षाने मागील काळात केल्या. मात्र त्या संदर्भात निवडणूक आयोगाला कळविण्यात आले नाही. याचा फटका शिवसेना पक्षाला बसणार असल्याचे बोलले जाते.

आम्हीच खरी शिवसेना आहोत, हा एक राजकीय रणनीतीचा भाग नसून ही वस्तुस्थिती असल्याचा दावा शिंदे गटातील एका आमदाराने केला आहे. प्रमुख ९ नेत्यांपैकी ६ नेत्यांचे शिंदे गटाला समर्थन आहे. यापैकी एकनाथ शिंदे, रामदास कदम हे २ नेते आहेत. १८ उपनेत्यांपैकी ११ उपनेत्यांचे शिंदे गटाला समर्थन आहे.

दुसरीकडे घटनेच्या दुप्पट नियुक्त्या केल्याचे निवडणूक आयोगाला संघटनेकडून कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना कोंडीत सापडली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची शक्यता असली तरी, शेवटी हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेच्या पक्ष घटनेनुसार जिल्हाध्यक्षांची ३५ अशी संख्या असायला हवी. मात्र ती सध्या ९४ आहे. तोच प्रकार विभाग अध्यक्षांबाबत घडला आहे. हे सर्व पक्ष घटनेच्या विपरीत असल्याने कागदोपत्री पुरावे आयोगाकडे सादर करणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे.

पक्ष आपला, धनुष्यबाण आपलेच, असा दावा शिंदे गटाकडून केला जात असला तरी, त्यात किती व कसे तथ्य आहे? हे निवडणूक आयोग आणि न्यायालयात ठरेल. मात्र या प्रकारचा प्रतिदावा शिवसेना (उद्धव ठाकरे समर्थक) गटाकडून देखील केला जातो. त्यामुळे भविष्यात हा वाद टोकाला जाणार असल्याचे शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते.

महत्वाच्या बातम्या-
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर अजित पवारांनी व्यक्त केली शंका; म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर…
Devendra Fadanvis: ओबीसी समाजामुळे मी घडलो आणि निवडून आलो, वाचा फडणवीसांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे
Karan Mehra: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ‘नैतिक’ने आपल्या पत्नीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – ज्या भावासोबत ती राखी बांधायची त्याच्यासोबत…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now