shinde government : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांना सळू की पळू केलं आहे. मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत घेतलेले निर्णय आता शिंदे सरकार बदलत आहेत. यामुळे सत्ताधारी, विरोधक आमने – सामने येतं असल्याच पाहायला मिळत आहेत.
शिंदे – फडणवीस सरकारने नुकताच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असतानाच त्यात आणखी एक भर पडली आहे. शरद पवारांच्या बारामतीमधील एक प्रकल्प जुन्नरला नेण्याच्या हालचाली आता शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत.
यामुळे आता पुन्हा एकदा सत्ताधारी – विरोधकांमधील संघर्ष आणखीच टोकाला जाणार असल्याचं बोललं जातं आहे. त्याचं झालं असं, मागच्या सरकारने म्हणजेच, महाविकास आघाडी सरकारने बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता.
या प्रकल्पासाठी खुद्द माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी अर्थसंकल्पात 60 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच आता शिंदे – फडणवीस सरकारने बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नरला नेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावर अद्याप विरोधकांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये. मात्र आगामी काळात याच मुद्यावरून पुन्हा राज्यात राजकारणात नवीन वाद निर्णय होणार असल्याच यानिमित्ताने बोललं जातं आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात फॉक्सकॉन प्रकल्पावरून वाद सुरू आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारवर अनेकांकडून टीका केली जात आहे. हा प्रकल्प तळेगाव येथे होणार होता. पण शिंदे फडणवीस सरकारने हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत अनेक प्रश्न उद्भवले आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde group : शिवसेनेला धक्का! विरोधकांची चिरफाड करणारी ठाकरेंची विश्वासू वाघीणही शिंदे गटात जाणार
sharad koli : आदित्य ठाकरेंनी या खास माणसावर सोपवली मोठी जबाबदारी, गद्दारांना शिकवणार धडा
Sharad Koli : ;तानाजी सावंत असो किंवा शहाजी पाटील असो, त्यांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही’’