Share

Shinde : शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात..! सत्तास्थापनेबाबत माहिती अधिकारात झाला धक्कादायक खुलासा

eknath shinde and devendra fadanvis

shinde fadanvis goverment shocking infornation in rit | शिंदे – फडणवीस सरकार स्थापनेबाबतची एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या सत्तास्थापनेबाबत माहिती अधिकारात एक खळबळजनक खुलासा झाला असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे.
यामुळे शिंदे – फडणवीस सरकार धोक्यात येणार असल्याचं देखील आता बोललं जातं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करतं शिवसेनेमध्ये उभी फुट पडली. 40 आमदारांनासोबत घेऊन शिंदे यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करत राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन केले.
साधारण शिंदे – फडणवीस सरकारने दोन महिन्यांचा कार्यकाळ आता पूर्ण केला आहे. मात्र असं असलं तरी देखील सत्तास्थापनेबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे नक्कीच सत्ताधाऱ्यांची झोप उडणार असल्याचं बोललं जातं आहे. वाचा नेमकं प्रकरण काय..?
काही दिवसांपूर्वीच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तास्थापनेसाठी कोणत्या तारखेस राज्यपालांना भेटले याची माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी मागविली होती. आता यामधूनच मोठी माहिती समोर आली आहे.
अखेर आता जभवन कार्यालयाने उत्तर दिले आहे. फडणवीस यांची राज्यपालांसोबत भेट झाल्याची नोंदच राजभवन दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत नसल्याची माहिती समोर आली आहे. यातून स्पष्ट होतं आहे की, सत्तास्थापनेवेळी फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत असा दावा केला जात आहे.
यामुळे 28 जुन 2022 रोजी फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा यादव यांनी केला आहे. पुढे यादव यांनी म्हंटलं आहे की, शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती राज्यपालांनी अद्यापही त्यांच्याजवळच राखुन ठेवली असून त्यांच्याच राजभवन कार्यालयासही उपलब्ध करुन दिली नाही.

महत्वाच्या बातम्या-
shivsena : ‘अपेक्षेप्रमाणे धनुष्यबाण गोठवला.. नावही बदलावं लागणार.. वाघांच्या भांडणात कमळाबाईचं फावलं..!’
amit shah : …अन् त्यावेळी काँग्रेस नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला ‘तो’ किस्सा
uddhav thackeray : आणखी एक ठाकरे येणार राजकारणात, बाळासाहेबांच्या मोठा नातू म्हणतो बापाचं देणघेणं नाही, उद्धवकाकांनी संधी….

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now