ठाकरेंना जमवला आणखी एक ताकदवान भिडू, मुंबईत ताकद वाढणार; शिंदे गटाला भरली धडकी

राज्याच्या राजकारणात सध्या युतीचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांआधीच ठाकरे सरकार च्या नाकाखालून ४० आमदार निघून जातात आणि राजकीय सत्तेला नवीन वळण मिळते.

अशातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच या युतीबाबत पक्षातील काही प्रमुख नेत्यांनीदेखील सुचक वक्तव्य केली होती.

ठाकरे गटाची आणि वंचित आघाडी यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतांनाच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून एक नवीन धक्का ठाकरे गटाला देतात की काय? असे माहितीनुसार कळतेय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती अधिकृतरित्या आज जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या युतीमुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असे म्हणता येईल.

आजच्या या १ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रीपब्लिकनचे प्रा.जोगेंद्र कावडे एकत्र येत अधिकृतपणे युती जाहीर करण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची युतीची तयारी सुरूच होती. तितक्यात शिंदे गटाकडून जर आज शिंदे गटाने पीपल्स रिपब्लिकनसोबत युती जाहीर केली तर ठाकरे गटाला शिंदे गटाकडून हा अजून एक धक्का बसणार हे नक्कीच.

महत्वाच्या बातम्या
Shivsena : संस्थापक शिवसैनिकांपैकी एक असलेल्या जेष्ठ नेत्याने सोडली शिवसेना, ठाकरे गटात उडाली खळबळ
shivsena : शिंदेंना दणका! ‘या’ जिल्ह्यात शिंदे गटात गेलेले सगळेच्या सगळे शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात दाखल
eknath shinde : औरंगजेब क्रुर अन् हिंदूद्वेष्टा नव्हता म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्री शिंदे संतापले; म्हणाले, त्याचा पुळका…