Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

shinde group : “शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार”

Mayur Sarode by Mayur Sarode
January 4, 2023
in ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
Eknath Shinde's MLA

asim sarode statement on shinde group  | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवत राज्यात सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंंदेसोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेना न्यायालयात गेली आहे.

तसेच या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. त्यामुळे याप्रकरणी काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे असताना आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे सरोदे यांनी म्हटले आहे.

आता सध्या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ आहे. पण ते सात न्यायाधीशांचे घटनापीठ पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याप्रकरणात नवीन न्यायाधीशांना घेण्यात येईल त्यांचा समावेश करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

आपण भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्युलचा विचार केला तर दहाव्या परिशिष्टातील २१ ए नुसार स्पष्टपणे पक्षविरोधी कारवाया जे करत असतील, त्यांना अपात्र ठरवण्यात येऊ शकते, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

तसेच शिंदे गटातील आमदारांनी पक्ष सोडला नसला तरी स्वत:च्या वागणुकीनुसार त्यांनी पक्षविरोधी काम केलं आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात येऊ शकते. इतकंच नाही तर काही काळासाठी राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे. त्यावरही असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग हे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे कर्णधार आहे. राज्यपाल पद सोडून त्यांना पुन्हा तिथे जाण्याची गरज आहे, जिथून ते आले आहे.

राज्यपाल हे त्यांचे राजकीय पक्षाचे विचार बाजूला ठेऊ शकलेले नाही. ते अजूनही एका पक्षाचे प्रतिनिधित्व करत असल्यासारखे वागत आहे. त्यामुळे ते सातत्याने चुकीचे आणि वादग्रस्त विधाने करत आहे, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
ठाकरेंना जमवला आणखी एक ताकदवान भिडू, मुंबईत ताकद वाढणार; शिंदे गटाला भरली धडकी
urfi javed : …तर चित्रा वाघ यांची आणि माझी चांगली मैत्री होईल; उर्फीचा चित्रा वाघ यांना टोला 
Garlic : लसूण खाताय? ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका लसणाचे सेवण, होतील गंभीर परिणाम

Tags: Asim SarodeBJPEknath Shindeअसीम सरोदेएकनाथ शिंदेभाजप
Previous Post

ठाकरेंना जमवला आणखी एक ताकदवान भिडू, मुंबईत ताकद वाढणार; शिंदे गटाला भरली धडकी

Next Post

urfi javed : उर्फी जावेद करणार भाजपमध्ये प्रवेश? स्वतःच ट्विट करत म्हणाली मी भाजपमध्ये प्रवेश….

Next Post
urfi javed

urfi javed : उर्फी जावेद करणार भाजपमध्ये प्रवेश? स्वतःच ट्विट करत म्हणाली मी भाजपमध्ये प्रवेश….

ताज्या बातम्या

अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत करणार लग्न! उपमुख्यमंत्रीही होणार? स्वत:च पोस्ट करत म्हणाले…

April 2, 2023

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच मृत्यू; अवघ्या २५ सेकंदात होत्याचं नव्हतं..

April 2, 2023

‘तुम्ही एकदा कोल्हापूरला याच मग…’, संभाजीराजेंनी महंतांना ठणकावले; संयोगिताराजेंबाबत म्हणाले, त्यांनी…

April 2, 2023

आता ऊसाच्या रसावरही लागणार १२ टक्के GST; सरकारचा मोठा निर्णय

April 2, 2023

शेजाऱ्यांच्या घरात मध्यरात्री भयानक आक्रोश, खिडकीतून पाहील्यावर दिसले की पोराने ३८ सेकंदांत ४७ वेळा…

April 1, 2023

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तुफान राडा! सुरक्षा जवान आणि भक्तांमध्ये जुंपली, भक्तांना बेदम मारहान

April 1, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group