शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे राज्याच्या सत्तेत अनेक बदल बघायला मिळाले. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची? असा प्रश्न सगळ्यांसमोर असता, ठाकरे गटाचे चिन्ह फ्रिज करण्यात आले. यानंतर शिंदे गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना तर ठाकरे गटाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे जाहीर झाले. परंतु अजुनही शिवसेना कोणाची ? हा प्रशन निवडणूक आयोगाने सोडवलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वकिलांनी एक मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे वकील यांच्या दाव्यानुसार उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच कायदेशिर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पक्षाची रचना, संघटनेची जुनी आणि नवी घटना यावर युक्तीवाद केला आहे.
या युक्तीवादात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची जुनी संघटना बाळासाहेबांच्या विचारांनी केंद्रीत होती आणि नंतर त्यात बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे नाव स्वत:साठी घेतले. त्यामुळे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख होत नाहीत. बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनेत उद्धव ठाकरे यांनी बदल केला परंतु हा बदल बोगस आहे, असाही दावा शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी केला आहे.
अद्याप कोणीही अपात्र ठरवण्यात आलेले नाही. यामुळे धनुष्यबाण कुणाचे? हे ठरवण्यात अजुनतरी काही निष्कर्ष नाही. शिंदे गटाकडे आमदार आणि खासदार यांच्या संखेनुसार बहुमत आहे. ही आकडेवारी अतिशय महत्वाची आहे. कायद्यात राजकीय पक्ष म्हणून जे नियम आहेत त्यानुसार शिंदे गट योग्य आहे, असेही वकील महेश जेठमलानी यांनी सांगितले आहे.
ही सुनावणी सुरु असतांनाच संजय राऊत निवडणूक आयोगातुन बाहेर पडले. तेव्हा कोणत्याच पत्रकाराशी संवाद न करता ते तसेच निघुन गेले. नेहमीच पत्रकारांशी संवाद साधणारे राऊत तसेच निघुन गेल्यामुळे आता चर्चेला उधान आले आहे.
निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असुन नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावर काहीतरी तोडगा निघेल याची सर्व वाट पाहत आहेत. दरम्यान शिंदे गटाचे वकील यांनी निवडनूक आयोगात केलेल्या दाव्याने ठाकरे गटाला एक मोठा धक्काच बसला आहे. आता या दाव्याला प्रतिउत्तर म्हणून ठाकरे गट कोणता युक्तिवाद मांडेल यावर सगळ्यांची नजर असेल.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : संस्थापक शिवसैनिकांपैकी एक असलेल्या जेष्ठ नेत्याने सोडली शिवसेना, ठाकरे गटात उडाली खळबळ
yogesh kadam : शिंदे गटातील आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे आहे बंगाली बाबाचे कनेक्शन; झाला मोठा खुलासा
हिंदू मुली म्हणजे काय खेळणं आहेत का? लव्ह जिहादच्या मुद्द्यावर शेलार आक्रमक, ठाकरेंना दोष देत म्हणाले…