shilpa tulaskar talking about Swapnil Joshi | काही मालिका या खुप कमी वेळामध्ये घराघरात पोहचत असतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे तु तेव्हा तशी. झी मराठीवरील ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. खुप वेगळी कहाणी असल्यामुळे ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेच्या मुख्यभुमिकेत शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी आहे.
या मालिकेत स्वप्नील जोशी हा सौरभ आणि शिल्पा ही अनामिकाची भूमिका साकारत आहे. तर अशोक समर्थ हा तिच्या पतीची भूमिका साकारत आहे. सौरभ आणि अनामिकाच्या नात्यात फुट पडली होती. त्यामुळे त्यांचे नाते वेगळे वळण घेत होते. पण आता पुन्हा एकदा ते एकत्र आले आहे.
अशात तु खुप जवळ आल्याचे पाहायला मिळते. शिल्पा ही स्वप्नील जोशीसोबत इंटीमेट सीन देताना दिसून येत आहे. आता या सीनवर शिल्पाने भाष्य केले आहे. शिल्पाने अमृता फिल्म्स या युट्युब चॅनेलशी संवाद साधला होता. त्यामध्ये बोलताना तिने याबाबत वक्तव्य केले आहे.
एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री शुटींगदरम्यान सतत एकत्र असतात. तेव्हा एकत्र असताना प्रेमात पडणं असं कधी घडलं आहे का? याबाबत बोलाताना तिने स्वप्नीलबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली की, स्वप्नील जोशीबाबतच मी सांगते. स्वप्निलबरोबरच माझे खुप छान आणि इंटिमेट सीन आहे. छान यामुळे म्हणतेय कारण त्यांची शुटींग खुप चांगली असते.
पुढे ती म्हणाली, इथं माझ्या सहकलकारांना त्याचं श्रेय द्यायला हवं. स्त्रीला स्पर्शातून कळतं की काय गडबड आहे. जर सीन करताना माझ्या सहकलाकाराला काही वाटलं तर ते माझ्यापर्यंत न पोहचू देणं हे खुप कठीण काम असतं. आपण सुशिक्षित आणि समजदार असतो. त्यामुळे आपण जर आपल्याला मर्यादा घातल्या नाही, तर प्रत्येक सेटवर तुम्हाला प्रेम होणार आणि मग तुमचा प्रेमभंग होईल.
तसेच पुढे बोलताना ती म्हणाली की, मी स्वप्नीलसोबत एक सीन करत होते जिथे त्याचं डोकं माझ्या डोक्याला आणि त्याचं नाक माझ्या नाकाला लागलं होतं. तेव्हा आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं. तिथे एक आणखी व्यक्ती होता. तेव्हा स्वप्नीलमध्येच म्हणाला की, असं वाटतंय आपल्या तिघांचं अफेअर आहे. आपल्याला सेटवर कोणाचं तरी अफेअर होताना दिसतं पण हे वाटतं तितकं सोपं नसतं.
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी कोर्टात गेलेल्या ठाकरेंना न्यायालयाचा दणका
“धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर घेतला? हायकोर्टात तुफान घमासान
uttar pradesh : प्रेयसीच्या घरच्यांनी दिला लग्नाला नकार; तरूणाने फेसबूकवर Live व्हिडीओ करत चिरला स्वतःचा गळा