Share

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मुलगा १० व्या वर्षी बनला बिझनेसमन, वडील राज कुंद्रासोबत करणार ‘हे’ काम

Shilpa Shetty

Shilpa Shetty, Raj Kundra, Viaan Kundra, Business/ शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते की तिचा 10 वर्षांचा मुलगा वियानने वडील राज कुंद्रा यांच्यासोबत बिजनेस सांभाळण्यास सुरुवात केली आहे. शिल्पाने तिच्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या आईसाठी खास बनवलेले शूज दाखवत आहे. शिल्पाच्या मुलाचे सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे.

व्हिडिओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने लिहिले की, माझा मुलगा वियान-राजचा पहिला आणि अनोखा व्यावसायिक उपक्रम – ‘vrkickss’ जो ऑर्डरवर स्नीकर्स बनवतो. लहान मुलांना आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. व्यवसायाच्या कल्पना आणि संकल्पनांपासून ते डिझाईन्स आणि अगदी व्हिडिओ देखील त्यांचेच आहेत! उद्योगपती आणि दिग्दर्शक.

ती पुढे लिहिते, आश्चर्य म्हणजे या छोट्याश्या वयात त्याने मिळालेल्या पैशांपैकी काही पैसे चॅरिटीला देण्याचे वचन दिले आहे. तो फक्त 10 वर्षांचा आहे. या नव्या पिढीने आईला आश्चर्यचकित केले आहे. त्याचा मला अभिमान आहे. मुलाला शुभेच्छा. व्हिडिओच्या शेवटी शिल्पा शेट्टीही दिसत आहे.

सेलिब्रिटींसोबतच चाहतेही व्हिडिओवर भरभरून प्रेम करत आहेत. शिल्पाची जवळची मैत्रीण आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान हिने कमेंटमध्ये वियानच्या आत्मविश्वासाचा उल्लेख केला. शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीने लिहिले, तुमच्या कस्टमाइज स्नीकर्सची वाट पाहू शकत नाही. मावशीला अभिमान आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वियानच्या ब्रँडला ‘VRKICKS’ किंवा Viaan Kicks असे नाव देण्यात आले आहे, जो ऑर्डरनुसार शूज, कपडे आणि बॅग बनवतो. त्याच्या उत्पादनाची किंमत 4999 रुपयांपासून सुरू होते. पोस्टच्या कमेंट विभागात, वियानने खुलासा केला की ही रक्कम शिल्पा शेट्टी फाउंडेशनकडे जाईल.

शिल्पा शेट्टीला तिच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता, परंतु काल रात्री ती व्हीलचेअरवर बसून एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. वर्क फ्रंटवर, शिल्पा शेवटची ‘हंगामा 2’ मध्ये दिसली होती. तिच्याकडे सोनल जोशी दिग्दर्शित ‘सुखी’ नावाचा चित्रपट आहे आणि रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलिस फोर्स’ नावाची वेब सिरीज देखील आहे.

महत्वाच्या बातम्या-
खूपच रॉयल लाईफ जगते शिल्पा शेट्टी, दुबई, लंडनमध्ये आहे कोट्यवधींचे फ्लॅट; ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीण
जेव्हा हॉलीवूडच्या अभिनेत्याने शिल्पा शेट्टीला स्टेजवरच केले होते वारंवार किस, शिल्पा काहीच बोलू शकली नाही
पती राज कुंद्राला सोडून या अभिनेत्याच्या प्रेमात पडलीये शिल्पा शेट्टी, स्वत:च खुलासा करत म्हणाली

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now