Share

Shilpa Shetty: पाय दुखत असतानाही गणपतीसमोर नाचली शिल्पा शेट्टी; चाहत्यांनी ठोकला सलाम

shilpa shetti

शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty): हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. शिल्पा तिच्या अप्रतिम डान्ससाठी ओळखली जाते. तसेच शिल्पा शेट्टीचे नाव तिच्या उत्कृष्ट फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान शिल्पाचा पाय फ्रॅक्चर झाला. तरीही तिने गणेश चतुर्थीचा पवित्र सण हलक्याफुलक्या पद्धतीने साजरा केला आहे.

दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शिल्पा शेट्टी जखमी असूनही पुष्पा चित्रपटाच्या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिची बहीण शमिता शेट्टीही तिच्या सोबत दिसून येत आहे. शिल्पा शेट्टी काहीही करेल पण डान्समध्ये तडजोड करणार नाही. तिचे डान्सवरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शिल्पा शेट्टी खूप एन्जॉय करताना दिसली.

अलीकडेच मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शिल्पा डान्स करताना दिसत आहे. शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीही डान्स करताना दिसत आहे. वास्तविक शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा सुपरहिट चित्रपट पुष्पामधील स्वामी या गाण्यावर हुक स्टेप्स करताना दिसत आहेत.

मात्र, पायाला दुखापत झाल्यामुळे शिल्पा शेट्टी एका जागी उभी राहून हलकासा डान्स करत आहे. पण या अवस्थेत डान्स करून शिल्पा शेट्टीने तिला बॉलिवूडची बेस्ट डान्सर म्हटले जात नाही हे सिद्ध केले आहे. शिल्पा शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झालेला हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टीच्या या डान्स व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

तर, त्याचवेळी काही चाहते शिल्पा शेट्टीच्या उत्साहाला सलाम करत आहेत की, जखमी असतानाही ती नाचत आहे. शिल्पा शेट्टीचे डान्सवरचे प्रेम पाहून चाहते शिल्पाचे अधिकच कौतुक करत आहे. शिल्पा शेट्टी अखेरची हंगामा 2 या चित्रपटात अभिनेत्री म्हणून दिसली होती, अशी माहिती आहे. तो चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

महत्वाच्या बातम्या
Baba Venga: बाबा वेंगा यांनी भारताबाबत केली भयानक भविष्यवाणी; यंदा देशावर येणार ‘हे’ मोठं संकट
Youtube: ‘या’ गावातील १ हजार लोकं युट्यूबच्या जीवावर कमावतात प्रचंड पैसे; वाचा भन्नाट स्टोरी
Eknath Shinde : १२ आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; आता महाविकास आघाडी काय करणार?
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना पाडायला अजित पवारांनी खेळला गेम; ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार रिंगणात

इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now