बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच मसूरीवरून मुंबईला परतली. मुंबईच्या विमानतळावर ती तिचा मुलगा वियान आणि मुलगी समीशासोबत दिसली होती. यावेळी काही माध्यम कर्मचाऱ्यांनी तिचे फोटो व्हिडिओ काढले. यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विमानतळावर उपस्थित एका फोटोग्राफर शिल्पाच्या मुलाला मास्क काढण्यास सांगतो. पण वियान मास्क काढणार नाही, असे शिल्पा म्हणते. तसेच यावेळी शिल्पा तिच्या बहिणीला वोट करण्याची मागणीही करताना दिसून आली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शिल्पाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, शिल्पा आपल्या मुलांसोबत विमानतळावरून आपल्या कारकडे जात असते. यादरम्यान एक फोटोग्राफर शिल्पाचा मुलगा विहानला मास्क काढण्यास सांगतो. तेव्हा शिल्पा म्हणते वियान मास्क काढणार नाही.
त्यानंतर शिल्पा वियानचा हात पकडून पुढे चालू लागते. तेवढ्या वियान हसत हसत त्याचा मास्क काढतो आणि कॅमेऱ्याला पोझ देतो. वियानच्या या क्यूट स्माईलने सर्वांची मने जिंकून घेतली.
या व्हिडिओत शिल्पा पुढे जाताना माध्यम कर्मचाऱ्यांना म्हणते की, ‘शमिताला भरपूर वोट करा. यावेळी ती जिंकलीच पाहिजे’. दरम्यान, शिल्पाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टी तिच्या पती आणि मुलांसोबत ख्रिसमसच्या अगोदर मसूरीला सुट्टया घालवण्यासाठी गेली होती. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे चाहत्यांशी शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टसना चाहत्यांनीही खूप पसंती दर्शविली.
दरम्यान, पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पाचा पती राज कुंद्राला या वर्षाच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो आता जामीनावर बाहेर आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो माध्यमासमोर येण्यास टाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTOS: जंगलाच्या मधोमध धबधब्यामध्ये अंघोळ करताना दिसली सामंथा, गोव्यात घेतेय सुट्टीचा आनंद
कोहली भज्जीची दुसरी आई! सोशल मिडीयावर का व्हायरल होतेय पोस्ट? जाणून घ्या नेमकं प्रकरण..
अक्षय कुमारने १५० कोटी घेऊन साईन केला चित्रपट; बनला सर्वात महागडा अभिनेता