मागील काही काळापासून संगीत जगताला हादरवून टाकतील असे धक्के बसत आहेत. लोकप्रिय संगीतकाराच्या अचानक जाण्याने सगळे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. केके, सिद्धू मुसावालानंतर आता शील सागर या संगीतकाराचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत राहणारा गायक आणि संगीतकार शील सागर तरूणांमध्ये फार लोकप्रिय होता. ‘इफ आई ट्राइड’ या त्याच्या गाण्याने शील सागरला खूप लोकप्रियता मिळवून दिली. (shil sagar famousn musician died the age 22)
दिल्लीत राहणारा गायक आणि संगीतकार शील सागर याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. वयाच्या २२व्या वर्षी या गायकाचे निधन झाले. त्याला कशामुळे मरण आले, याचे कारण स्पष्ट समजू शकले नाही.
अधिक माहितीनुसार, शील सागरचे १ जुन (बुधवार) रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यू मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी त्याच्या मृत्युच्या दुखःद बातमीला त्याच्या मित्रांनीच सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. त्याचा मित्र परिवार मोठा होता.
आजचा दिवस खूप दुःखाचा आहे… आधी KK आणि नंतर हा संगीतकार ज्याने #wickedgames गाण्यावर आपल्या परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली. ‘ हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शील सागर सारख्या तरुण, प्रतिभावान गायकाने इतक्या कमी वयात जग सोडून जाणे त्याच्या चाहत्यांना चटका लावून जाणारे आहे. त्याच्या अशा अवेळी जाण्याने संगीतप्रेमी शोकाकुल झाले आहेत. तो तरुणांमध्ये फार लोकप्रिय होता.
शील सागरच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या तरुण मुलाचे असे कमी वयात मरण पावणे त्याच्या कुटुंबियासाठी फार दु:खद आहे. समाजाच्या सर्व स्तरांतून, लोकांकडून त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
टार्गेट किलिंगची भीती! हजारो हिंदूंनी काश्मीर सोडलं; केंद्र सरकार नेमकं करतंय तरी काय..?
भारताने मोठ्या मनाने चहाचे कंटेनर पाठवले पण त्यात व्हायरस आहेत म्हणत ‘या’ देशाने केले रिटर्न
|८ वर्षांपूर्वी लग्न केले, पत्नी हातही लावू देत नाही; खासदाराच्या तक्रारीवर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय