shikhar dhawan main reason behind losing match | न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडसाठी यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथमने शानदार शतक झळकावून न्युझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्याशिवाय कर्णधार केन विल्यमसननेही उत्कृष्ट खेळी खेळली.
न्यूझीलंडकडून स्टार फलंदाज टॉम लॅथमने १४५ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी केन विल्यमसनही त्याच्यासोबत चांगला खेळला. केनने नाबाद ९४ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून शार्दुल ठाकूरने १ आणि उमरान मलिकने २ बळी घेतले. त्याचवेळी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी या सामन्यातून टीम इंडियासाठी पदार्पण केले.
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने ७६ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी खेळली. शुभमन गिल आणि शिखर यांच्या शतकी भागीदारीमुळे (१२४ धावा) भारताने ५० षटकांत सात गडी गमावून ३०६ धावा केल्या. त्याचबरोबर न्यूझीलंडला विजयासाठी ३०७ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली.
या सामन्यात शिखर धवनने मोठी चूक केली असल्याचे समजते. त्याच्या एका चुकीमुळेच भारतीय संघाला सामना गमवावा लागला असे म्हटले जात आहे. टॉम लॅथम जेव्हा फलंदाजीला आला. तेव्हा शिखर धवनने उमरान मलिकला गोलंदाजीची संधी दिली नाही. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला.
उमरान मलिकने पहिल्या वनडेच्या पहिल्याच सामन्यात खुप घातक गोलंदाजी केली. जर त्याला पुन्हा संधी मिळाली असती तर त्याने टॉमचीही विकेट घेतली असती. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकणे सोपे झाले असते. पण शिखर धवनने त्याला संधी दिली नाही. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला अशी चर्चा आहे.
तसेच यावेळी शिखर धवनने खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतवर पुन्हा विश्वात दाखवला आणि त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली. तर संजू सॅमसनलाही खेळण्यासाठी उशिरा पाठवले. जर तो आधी आला असता तर तो मोठी खेळी खेळू शकला असता.
महत्वाच्या बातम्या-
ramdev baba : महीलांनी कपडे नाही घातले तर मला त्या जास्तच छान दिसतात; रामदेवबाबांचे अमृता फडणवीसांसमोरच वादग्रस्त विधान
अभिनेता सलमान खान करणार करीष्मा कपूरसोबत लग्न? जाणून घ्या काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य
मैदानावर आले अर्जून तेंडूलकरच्या बॅटींगचे तुफान; नंतर घातक गोलंदाजी करत ठोकला टिम इंडीयात एन्ट्रीचा दावा






