Share

शिबानी दांडेकरने प्रेग्नेन्सीच्या चर्चांवर सोडले मौन, म्हणाली, टकीला जास्त पिल्यामुळे मला..

Shibani Dandekar About Her Prgnancy

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) नुकतीच त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) विवाहबंधनात अडकला. १९ फेब्रुवारी रोजी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या नवजोडप्याचे काही लेटेस्ट फोटो समोर आले. या फोटोंमुळे शिबानी प्रेग्नेंट असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. पण आता शिबानीने एक पोस्ट शेअर करत ती प्रेग्नेंट नसल्याचे स्पष्टीकरण दिले (Shibani Dandekar About Her Prgnancy)आहे.

शिबानीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर फरहान अख्तरसोबतचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शिबानी आणि फरहानने त्यांच्या मित्रांसाठी आयोजित केलेल्या एका पार्टीदरम्यानचे आहेत. यामध्ये शिबानी पती फरहानच्या खांद्यावर डोकं ठेऊन रोमँटिक अंदाजात पोझ देताना दिसून आली. तसेच यावेळी तिने खूपच टाईट ड्रेस घातला होता. यामुळे तिचा पोटसुद्धा थोडा बाहेर आलेला या फोटोत दिसत होता.

शिबानीचे हे फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शिबानी प्रेग्नेंट असल्यामुळेच दोघांनी लवकर लग्न उरकले, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. एका नेटकऱ्याने तिच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले की, ‘असे वाटत आहे की, ती प्रेग्नेंट आहे’. दुसऱ्याने लिहिले की, ‘डिलिव्हरी कधी आहे?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘ती तीन किंवा चार महिन्यांची प्रेग्नेंट आहे. अचानक लग्न ठरण्याचे कारण आता समोर आलं आहे’.

सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग आणि प्रेग्नेन्सीबाबत होणारी चर्चा पाहता शिबानीने एक पोस्ट शेअर करत याबाबत स्पष्टीकरण दिले. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओत मागे ‘आय अॅम अ वुमन’ हे इंग्रजी गाणं वाजत असून शिवानी तिचे अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसून आली. हा व्हिडिओ शेअर करत शिबानीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.

व्हिडिओसोबत तिने लिहिले की, ‘मी एक महिला आहे आणि मी प्रेग्नेंट नाही’. यासोबतच शिबानीने तिचे पोट दिसण्यामागचे कारण सांगताना लिहिले की, ‘ते टकीला होतं’. टकील जास्त पिल्यामुळे तिला ब्लोटिंगची समस्या झाल्याचे शिबानीने तिच्या या कॅप्शनद्वारे सांगितले आहे. यासोबतच तिने अनेक हसण्याचे इमोजीसुद्धा पोस्ट केले.

दरम्यान, फरहान आणि शिबानी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  १९ फेब्रुवारी रोजी अत्यंत खासगी समारंभात त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या या लग्नात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या :
दीपिकाने शेअर केले बेडरुम सिक्रेट; म्हणाली, “रणवीर नेहमी बेडवरच पडलेला असतो आणि…”
PHOTO: लतादीदींच्या नातीसमोर फिक्या पडतील सगळ्या अभिनेत्री, सचिन तेंडूलकरसोबत आहे खास कनेक्शन
१७ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती कंगना, त्याच्या बायकोला कळलं अन्..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now