Sher Shivraj : ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

दिग्पाल लांजेकर यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील चौथे पुष्प म्हणजेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. २२ एप्रिल रोजी शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिखस्त’ आणि पावनखिंड या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर आता शेर शिवराज या चित्रपटाद्वारे दिग्पाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा केलेला वध आणि यासोबत इतिहासातील अनेक प्रसंग दाखवले आहेत.

सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत असताना यामध्ये मराठी चित्रपटही मागे नसल्याचे ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) चित्रपटाने दाखवून दिले आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अनेक रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचे तिकिट अॅडव्हान्स बुकिंग केले होते. तर प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.०५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

तरण आदर्श यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘अद्भुत बातमी. शेर शिवराज या मराठी चित्रपटाच्या कमाईत महाराष्ट्रात लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी चित्रपटाने १.०५ कोटींची कमाई केली आहे. तसेच चित्रपटाला दुसऱ्या दिवशी दुप्पट स्क्रिनिंग मिळण्यासोबतच जवळपास अनेक शोज अॅडव्हान्स बुकिंगमुळे हाऊसफुल्ल झाले आहेत’.

दरम्यान, ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटात चिन्मय मांडलेकरसोबत बॉलीवूड अभिनेते मुकेश ऋषी, अभिनेत्री वर्षा उसगावकर असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेते मुकेश ऋषी या चित्रपटात अफझलखानाच्या भूमिकेत तर वर्षा उसगावकर या बडी बेगमच्या भुमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: यशचा साधेपणा पाहून चाहते भावूक; म्हणाले, ‘तुझा हा साधेपणाच तुझ्या यशाचे खरे रहस्य आहे’
‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीची हकालपट्टी? सलमानने मेव्हण्याला दिली पसंती
साऊथ इंडस्ट्रीला घाबरून बॉलिवूड आता पॅन इंडिया चित्रपट बनवणार? अजय देवगणने केला खुलासा