Share

‘बाब्या खातो दहा लाडू पण त्याला देणार कोण?’ अशी परिस्थिती सध्या मराठी सिनेसृष्टीची – चिन्मय मांडलेकर

chinmay mandlekar

दिग्पाल लांजेकर यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील चौथे पुष्प म्हणजेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘शेर शिवराज’ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे. यादरम्यान या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने एका मुलाखतीत बोलताना मराठी चित्रपटांचे मार्केट आणि बजेटबाबत आपले मत मांडले आहे.

चिन्मय मांडलेकरने नुकतीच एका रेडिओ वाहिनीला मुलाखती दिली. यावेळी बोलताना चिन्मयन म्हटले की, ‘मराठीचं मार्केट आणि मराठीच बजेट हे सध्या हवं तितकं नाहिये. बाब्या खातो दहा लाडू पण त्याला देणार कोण? अशी परिस्थिती सध्या मराठी सिनेसृष्टीची आहे’.

चिन्मयने पुढे म्हटले की, ‘आपल्यालाही वाटतं की, ‘बाहुबली’, ‘केजीएफ’सारखं चित्रपट बनवावं. पण त्या चित्रपटांच्या निर्मितीचं खर्च काही ‘शे’ कोटींच्या घरात आहे. मराठीत अजून कोटीच्या मागे हे ‘शे’ शब्द लागायचे आहेत. पण मला विश्वास आहे की, तेही लागतील एके दिवशी’

‘पण ते नाहीत म्हणून आपण आता नको बनवूया, असे होऊ शकत नाही. आहे त्यामध्ये आपण काय चांगलं करू शकतो, हा स्पिरिट महत्त्वाचा आहे. तसे सध्या मराठी चित्रपटांची कल्पकता वाढली असून प्रेक्षकांचाही या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही’, असेही चिन्मयने यावेळी म्हटले.

दरम्यान, ‘शेर शिवराज’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिखस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर आता ‘शेर शिवराज’ या चित्रपटाद्वारे दिग्पाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा केलेला वध आणि यासोबत इतिहासातील अनेक प्रसंग दाखवले आहेत.

या चित्रपटात चिन्मय मांडलेकरसोबत बॉलीवूड अभिनेते मुकेश ऋषी, अभिनेत्री वर्षा उसगावकर असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेते मुकेश ऋषी या चित्रपटात अफझलखानाच्या भूमिकेत तर वर्षा उसगावकर या बडी बेगमच्या भुमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
मुलाच्या मृत्युनंतर ‘हे’ मोलाचे काम करत आहे सिद्धार्थ शुक्लाची आई, पाहून नेटकरीही झाले भावूक
संजय दत्त ‘या’ अभिनेत्रीला म्हणाला सेक्सी; अजय, सलमान, अक्षयबाबतही केलं मोठं वक्तव्य
नवाजुद्दीन सिद्दीकीला बदलायचंय बॉलिवूडचं नाव, म्हणाला, ‘मला ‘या’ तीन गोष्टी मुळीच आवडत नाहीत’

मनोरंजन ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now