पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री शेहनाझ गिल अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर फारच चर्चेत आली. बिग बॉस शोदरम्यान शेहनाझ आणि सिद्धार्थ एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शेहनाझ कोलमडून गेली. मात्र, आता शहनाज स्वतःला सावरत असून सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच ती मोकळेपणाने बोलली आहे.
शेहनाझने नुकतीच तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ब्रम्हकुमारी बी. के. शिवानी यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. यावेळी शेहनाझने सिद्धार्थच्या मृत्यूनंर तिचे जीवन कसे होते, तसेच मागील दोन वर्षांचा तिचा अनुभव कसा होता याबाबत सांगितले आहे.
शेहनाझने म्हटले की, ‘मी नेहमी सिद्धार्थला म्हणत असत की, मला बी.के. शिवानी यांच्यासोबत बोलायचं आहे. मला त्या फार आवडतात. तेव्हा सिद्धार्थ म्हणायचा की, हां.. एक दिवस नक्कीच बोलू. तर आता त्याच्या निधनानंतर मी तुमच्याशी बोलत आहे’.
पुढे सिद्धार्थची आठवण काढत शेहनाझने म्हटले की, ‘मी नेहमी विचार करत असे की, सिद्धार्थच्या आत्म्याने मला इतके ज्ञान कसे काय दिले? अगोदर मला लोकांना ओळखता येत नव्हते. मी सर्वांवर विश्वास ठेवत असत. पण सिद्धार्थने मला खूप काही शिकवले. देवाने माझी आणि सिद्धार्थशी भेट घडवून दिली आणि आम्हा दोघांना एकत्र राहण्यास वेळ दिला. कारण देव इच्छित होते की, सिद्धार्थने मला ज्ञान द्यावे’.
‘मागील दोन वर्षात मी खूप काही शिकले. मी प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जात ते व्यवस्थित सांभाळत आहे. माझा प्रवास अजून सुरु आहे. सिद्धार्थचा प्रवास पूर्ण झाला. त्याने भूमिका बदलली आहे. परंतु तो कुठे ना कुठे परत आला आहे. सध्या माझ्याकडील त्याचे खाते बंद झाले. पण कदाचित ते पुन्हा सुरु होईल’.
‘प्रत्येकवेळी कोणाचा ना कोणाचा जवळचा व्यक्ती जग सोडून जात असतो. पण ती व्यक्ती आपल्याला सोडून गेला म्हणून रडत न बसता त्याच्यासोबतच्या अनेक आठवणी आपल्यासोबत आहेत याचा आपण विचार करावा’, असे शेहनाझने या व्हिडिओत म्हटले आहे.
My conversations with @bkshivani .
👇🏻 watch now 👇🏻https://t.co/FY7m4ts3qF pic.twitter.com/KVBOvN8F36
— Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) January 4, 2022
दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाचा २ सप्टेंबर २०२१ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी तो ४० वर्षांचा होता. त्याच्या अचानक निधनाने त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत अनेकांना मोठा धक्का बसला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
‘या’ ठिकाणी फक्त १५ लाखात मिळत आहे JAGUAR कार, वाचा कारची संपुर्ण डिटेल्स
‘हे’ 3 स्टॉक बनू शकतात 2022 चे ‘मल्टीबॅगर पेनी स्टॉक’, सुमीत बगाडियाने दिला खरेदीचा सल्ला
राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ स्टॉक खरेदी करा, ICICI सिक्युरिटीजने दिला सल्ला