Share

‘तिला किस करताना मी व्हर्जिनिटी गमावली’, बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा

shefali shah

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) सध्या तिच्या ‘ह्युमन्स’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी हॉटस्टारवर ही सीरीज प्रदर्शित झाली होती. या सीरीजमध्ये शेफालीचे तिच्या सहअभीनेत्रीसोबत एक किसींग सीन दिला होता. याबाबत फार चर्चा झाली होती. तर या किसिंग सीनबाबत नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना शेफाली शाहने खुलासा केला की, ऑनस्क्रिन किस करताना तिने तिची व्हर्जिनिटी गमावली होती.

‘ह्युमन्स’ या वेबसीरीजमध्ये शेफालीसोबत अभिनेत्री किर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत होती. शेफालीने यामध्ये डॉ. गौरी नाथ ही भूमिका तर किर्ती कुल्हारीने डॉ. सायरा सबरवाल ही भूमिका साकारली होती. या सीरीजमध्ये गौरी आणि सायरा दोघी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले. स्क्रीप्टनुसार दोघींनी या सीरीजमध्ये एक किसिंग सीन दिली होती.

याबाबत किर्ती कुल्हारीने नुकतीच एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, या सीनमुळे ती थोडीशी नर्व्हस होती. तसेच ऑनस्क्रिन किस करण्यासाठी तिला थोडीशी काळजीही वाटत होती. त्यानंतर शेफाली शाहने पिंकविलाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान शेफालीला किर्तीच्या किसिंग सीनवरील प्रतिक्रियेबाबत विचारण्यात आले होते.

त्यावर शेफालीने सांगितले की, ‘मला वाटते की तिच्याकडे खूप सेन्स ऑप ह्यूमर आहे. आणि तिने खरंच या सर्वांचा विचार केला आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचले तेव्हा मलाही वाटलं की, स्क्रिप्टनुसार किसिंग सीन गरजेचं आहे. स्क्रिप्टप्रमाणे इतर सर्वांसाठीही ही खूप मोठी गोष्ट होती.

शेफालीने पुढे सांगितले की, ‘मी यापूर्वी कधीही ऑनस्क्रिन किस केले नव्हते. त्यामुळे मी किस करताना माझी व्हर्जिनिटी गमावली होती. हा सीन करणे माझ्यासाठी कठिण नव्हते. कारण माझ्या समोरसुद्धा एक स्त्रीच होती. सीरीजमध्ये सायरा आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे हे सीन करणे आवश्यक होते.

शेफालीने म्हटले की, मी समलैंगिक नाही. पण याचा अर्थ असा नाही की मला त्यांच्याबाबत आदर नाही. मी माझे आदर व्यक्त करू शकत नाही. पण त्यावेळी त्या दोन महिलांना वाटणारी ती खरी भावना होती, असे शेफालीने यावेळी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या :
हा आवाज कुणाचा? राज ठाकरेंचा…; ‘या’ चित्रपटातून राज ठाकरेंची चित्रपटक्षेत्रात दमदार एन्ट्री
सलमान खानचे सोनाक्षी सिन्हासोबत झाले लग्न? त्या व्हायरल फोटोबाबत स्वता सोनाक्षीने केला खुलासा
वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलचा बोल्डनेस कायम, फक्त टी शर्टवर असताना शेअर केला व्हिडीओ

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now