Share

‘तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये’, शत्रुघ्न सिन्हांवर आरोप करणाऱ्या महिलेवर भडकला ‘हा’ व्यक्ती

shatrughan sinha

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांच्यावर बिग बॉस शोच्या ५ व्या सीझनची स्पर्धक पूजा मिश्राने नुकतीच काही दिवसांपूर्वी अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली. तर आता पूजा मिश्राच्या आरोपांवर शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा मिश्राने एका मुलाखतीत बोलताना असा दावा केला होता की, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीने तिचा करिअर संपवला आणि त्यांनी सेक्स स्कॅम केला. तसेच पूनम सिन्हा यांनी काळ्या जादूचाही वापर केल्याचे पूजाने मुलाखतीत म्हटले होते. एवढेच नाही तर माझं कौमार्य विकून शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या मुलीचं करिअर उभं केलं, असा धक्कादायक आरोपही तिने मुलाखतीदरम्यान केला होता.

पूजा मिश्राच्या या धक्कादायक आरोपानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हाने ट्विरद्वारे आपला संताप व्यक्त केला. त्याने ट्विट करत लिहिले की, त्या महिलेला प्रोफेशनल मदतीची गरज आहे. माझ्या कुटुंबीयांवर ज्याप्रमाणे त्या महिलेने आरोप लावले आहेत त्यावरून हे सिद्ध होते की, तिची मानसिक स्थिती ठीक नाहिये.

त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये लवने लिहिले की, सामान्यपणे इंटरनेटवर चालणाऱ्या अशा फालतू गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही. परंतु, अशा प्रकारच्या बातम्या छापणे आणि पसरवणे चुकीचे आहे. तसेच ज्या बेजबाबदार संपादकाने या स्टोरीला मान्यता दिली आहे त्यालाही माहित असायला हवे की, अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या प्रसारित केल्यामुळे त्यांच्यावरही मानहानीचा खटला दाखल होऊ शकतो.

 

पूजा मिश्राचा दावा आहे की,तिच्या वडिलांची आणि शत्रुघ्न सिन्हा यांची चांगली मैत्री होती. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे तिच्या हातून ३५ पेक्षा जास्त चित्रपट निघून गेले. पूजाने असा आरोप लावला आहे की, सिन्हा कुटुंबीय तिला बेशुद्ध करून सेक्सचा व्यापार करत होते. तसेच तिची व्हर्जिनिटी विकून त्यांनी सोनाक्षी सिन्हाला स्टार बनवले.

दरम्यान, पूजा मिश्राने यापूर्वीही अभिनेता सलमान खानवरदेखील गंभीर आरोप केले होते. सलमान खानवर तिने बलात्काराचा आरोप लावला होता. परंतु, नंतर मात्र तिने असे आरोप केल्याचे नाकारले.

महत्त्वाच्या बातम्या :
खूपच ग्लॅमरस अवतारात दिसली सारा तेंडुलकर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा फोटो
वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन हिंदू बहिणींनी ईदगाहसाठी दान केली ‘एवढ्या’ कोटींची जमीन
Junior NTR च्या लग्नात खर्च झालते तब्बल १०० कोटी; बायकोच्या साडीची किंमत ऐकून चक्कर येईल

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now