काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. अनेकदा ते त्यांच्या हटके इंग्लिशमुळे चर्चेत येतात, तर कधी ते त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचा लोकसभेतील व्हिडिओ. (shashi tharur on viral video )
शशी थरुर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा लोकसभेतील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर अनेक मीम्स बनत आहे. आता या व्हायरल व्हिडिओवर थरूर यांनी गुरुवारी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी सांगितले की ते सुप्रिया सुळेंसोबत एका महत्वाच्या मुद्यावर चर्चा करत होते.
हा व्हिडिओ मंगळवारी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचा आहे. नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलत होते आणि त्याचवेळी त्यांच्या मागे बसून सुप्रिया सुळे आणि शशी थरूर आपसात बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत.
यानंतर थरूर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संक्षिप्त संभाषणाचा आनंद घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या मला धोरणाशी संबंधित प्रश्न विचारत होत्या. कारण त्या पुढील वक्त्या होत्या. फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून त्या हळूच बोलत होत्या. मला त्यांचे शब्द ऐकू नव्हते येत, त्यामुळे मला पुढे यावे लागले होते.
https://twitter.com/Abhinav_Pan/status/1511758545746014209?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1511758545746014209%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.prabhatkhabar.com%2Flife-and-style%2Fshashi-tharoor-was-talking-to-a-woman-mp-supriya-sule-in-parliament-memes-and-video-viral-amh
त्यानंतर शशी थरूर यांनी आणखी एक ट्विट केले. यावेळच्य ट्विटमध्ये त्यांनी अमर प्रेम चित्रपटातील गाण्याचा संदर्भ दिला. त्यांनी लिहिले की, “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना! कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई. तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहां बदनाम हुई. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!”
दरम्यान, व्हायरल झालेली ही क्लिप लोकसभेच्या अधिवेशनादरम्यानची आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करून शशी थरूर हसत हसत जवळ बसलेल्या बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलत आहेत. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी मीम्सही बनवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
जोडप्यांना किस करण्यास आणि एकत्र झोपण्यास बंदी, ‘या’ शहरात अजब-गजब लॉकडाऊन, कोरोनाचा हाहाकार
‘माझी पत्नी जीन्स टॉप घालते’, मुलाच्या कस्टडीवरून नवऱ्याचा अजब युक्तिवाद; उच्च न्यायालयाने दिले असे उत्तर
गोरखनाथ हल्ला: विदेशी सिमकार्डद्वारे ISIS च्या संपर्कात होता अब्बासी, नेपाळमार्गे सिरीयाला पाठवले लाखो रुपये