Share

जर पंधरा वर्षांपूर्वी कानाखाली लगावली नसती तर.., मराठी भाषा दिनादिवशी शर्मिला ठाकरेंचे मोठे वक्तव्य

रविवारी संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा दिवस साजरी करण्यात आला. या दिनानिम्मित ठाण्यात मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्याची काही लोकांना लाज वाटत होती, तर काहींना ती सक्ती वाटत होती. मात्र आज महाराष्ट्रात मराठी भाषेचा सर्व ठिकाणी उल्लेख केला जातो, ते फक्त मनसेमुळे शक्य झाले असल्याचे म्हणत मनसेसैनिकांचे कौतुक केले.

तसेच मराठी भाषा सर्वांच्या बोलण्यात आणि ऐकण्यात यावी यासाठी मनसेकडून ‘खळखट्याक’ आंदोलने करण्यात आली. या प्रयत्नांमुळेच आज मराठी भाषेचा समावेश महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी करण्यात आला असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले. याचबरोबर, जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी, आपण मराठीच बोलले पाहिजे, आपण मराठीमध्ये सवांद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

इतकेच नव्हे तर, जर पंधरा वर्षांपूर्वी कानाखाली लगावली नसती तर, आजही आपल्याला दुकानांवर हिंदी आणि इंग्रजीमध्येच पाट्या पाहायला मिळाल्या असत्या. १५ वर्षापूर्वी कानाखाली लगावल्यामुळेच हे शक्य झाले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला लढा याचे आज हे फळ असून, महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद असल्याची खंत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली.

मराठी दिनानिम्मित ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे गौरव महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडेसह अनेक प्रमुख व्यक्तींनी आपली हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे तेथील महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. तसेच या महिलांचे कौतुक करत त्यांना मराठी भाषा दिनाचे महत्व पटवून दिले.

त्यासोबतच, मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे ३६५ दिवस मराठीतच बोलले पाहिजे व यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. मुख्य म्हणजे, गाण कोकिळा लतादीदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या स्मरणार्थ मोठे संगीत विद्यापीठ सुरू करण्यात यावी अशी भावना व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या
”हिमालयातून अभ्यास करून आलेल्या राज्यपालांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी योग्य माहिती द्यावी”
छत्रपतींचे खरे गुरू कोण? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ जूना व्हिडियो व्हायरल
Varsha Usgaonkar Birthday: वर्षा उसगांवकरने एकदा केलं होतं टॉपलेस फोटोशूट, झाली होती प्रचंड टीका
६०० एपिसोडपर्यंत शिव्यांचा अक्षरशः वर्षाव झाला; ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now