शार्दुल ठाकूर : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने अर्धशतक झळकावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र तो बाद झाल्यानंतर संघाची मधेच पडझड झाली.
अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूरने जबाबदारी स्वीकारली आणि धडाकेबाज डावात संघाची धावसंख्या 204 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याची स्फोटक फलंदाजी पाहून चाहते खूप खूश झाले आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक करताना दिसले.
शार्दुल ठाकूरने धडाकेबाज खेळी केली. नाणेफेक गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आले आणि रहमानउल्लाहने संघाला सुरेख सुरुवात करून दिली. त्याने 57 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. पण गुरबाज, आंद्रे रसेल आणि नितीश राणा बाद झाल्यानंतर केकेआरचा डाव डळमळीत झालेला दिसत होता.
अशा स्थितीत रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांनी डाव सांभाळत शतकी भागीदारी केली. मात्र, रिंकू 46 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर शार्दुल शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत एका टोकाला राहिला. त्याने 29 चेंडूत 68 धावा केल्या.
त्यामुळे संघाला 7 गडी गमावून 204 धावा करता आल्या. त्याची खेळी पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आणि टाळ्यांचा कडकडाटही दिसून आला. त्यावर ट्विटरवर भन्नाट प्रतिक्रीया देण्यात आल्या आहेत. त्या वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
टीम इंडियाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरची कामगिरी नेहमीच अप्रतिम राहिली आहे. शार्दुलला आधी फक्त गोलंदाजीसाठी संघात घेतले होते, पण आधी ऑस्ट्रेलिया, नंतर इंग्लंड आणि आता दक्षिण आफ्रिकेत शार्दुलने अप्रतिम कामगिरी केली आहे.
तसेच तो फलंदाजीही चांगली करताना दिसून येत आहे. त्यामुळे तो संघात हार्दिक पांड्याची कमतरता अजिबात भासू देत नाही. निवडकर्ते ज्या पद्धतीने शार्दूलला प्रत्येक सामन्यात संधी देत आहेत, त्यावरूनही या खेळाडूवर सर्वांचा विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे.
#KKRvRCB #Shardulthakur
RCB celebrating on Russell's wicketShardul thakur:- pic.twitter.com/m5bYUWXNgv
— introvert_cell (@Ajitchy2) April 6, 2023
याशिवाय शार्दुलला संघाचा पेअर ब्रेकर देखील म्हटले जाते. यामागचे कारण म्हणजे हा अशावेळी धमाकेदार कामगिरी करताना दिसतो, जेव्हा भारतीय संघाला त्याची जास्त गरज असते.
महत्वाच्या बातम्या
कलम ३७० हटवल्यावर कश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांनी किती जमीन खरेदी केली? समोर आली धक्कादायक माहिती
मॅच जिंकताच शार्दुलला मिठी मारायला धावला रोहीत, पांड्याची ब्रेसवेलला शाबासी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ तुफान व्हायरल






