Share

उदयपूर हत्या प्रकरणानंतर शरद पोंक्षेंचे खळबळजनक वक्तव्य; हिंदूंनो जागे व्हा…

राजस्थानमधील(Rajsthan) उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याबद्दल टेलर कन्हैयालाल यांची गळा कापुन हत्या करण्यात आली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे.

कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसलेल्या हल्लेखोरांनी हा गुन्हा करतानाचा व्हिडिओही(Video) बनवला आहे. व्हिडिओमध्ये दोन हल्लेखोर हातात तलवारी घेऊन आपल्या अत्याचाराची कबुली देताना दिसत आहेत. पोलिसांनी आता या दोन्हीही आरोपांनी अटक केली आहे.

तर दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील उदयपूर हत्या प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. नेहमी आपल्या व्यक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या पोंक्षे यांची आताची पोस्टदेखील चर्चेत आली आहे.

उदयपूर हत्या प्रकरण घडल्यानंतर पोंक्षे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आठवण झाली. पोंक्षे यांनी यांनी वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या काही ओळींचा फोटो शेअर करत उदयपूर हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. सध्या पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

 

वाचा काय आहे त्या पोस्टमध्ये… पोस्टमधून पोंक्षे यांनी म्हंटलं आहे की, “प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्तान जगू शकेल.” पोंक्षे यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं, “जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.”

दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी व्हिडिओही जारी केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धमकावले आहे. हल्लेखोराने पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देताना म्हंटला की, “नरेंद्र मोदी ऐक, तुम्ही आग लावली आहे आणि आम्ही ती विझवू, मी देवाला प्रार्थना करतो की हा चाकू तुमच्या गळ्यावर नक्कीच पोहोचेल.” उदयपूरच्या जनतेने पैगंबराचा नारा बुलंद करावा, एकच शिक्षा, शरीरापासून वेगळे. प्रार्थनेत लक्षात ठेवा.

 

इतर क्राईम ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now