sharad ponkshe in women look | मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या अभिनयासोबतच ते त्यांच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत येत असतात. ते परखडपणे आपले मत मांडताना दिसून येतात. तसेच ते त्यांच्या भूमिकांमुळेही चर्चेत येत असतात.
आता पुन्हा शरद पोंक्षे त्याच्या एका भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. ते पहिल्यांदाच एका स्त्रीची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. त्यांनी याआधी नायक, खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण आता ते पहिल्यांदाच स्त्रीची भूमिका साकारताना दिसून येणार आहे.
स्त्री भूमिकेतील त्यांचा लूकही समोर आला आहे. त्यांच्या त्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कपाळाला कुंकू, नाकात नथ, खांद्यावर पदर असा त्यांचा लूक दिसून येत आहे. त्यामुळे शरद पोंक्षेंच्या या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते सुद्धा खुप उत्सुक आहे.
सध्या शरद पोंक्षे हे एका मालिकेत काम करत आहे. झी मराठीवरील दार उघड बये या मालिकेत ते खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे. या भूमिकेत ते पुरुषी अहंकार बाळगताना दिसून येतात. असे असतानाही लोकांना त्यांची ही भूमिका आवडत आहे.
आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ५ डिसेंबरपासून या मालिकेचा ऍक्शन पॅक आठवडा सुरु होणार आहे. पुरुषी मक्तेदारीला तोंडावर पाडण्यासाठी स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटनाता दिसणार आहे. मुक्ता सारंगचा गृहप्रवेश झाल्यानंतर रावसाहेब तिच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात.
रावसाहेब मुक्तासमोर वेगवेगळी आव्हाने उभी करत आहे. पण तिला या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिचा पती सारंगची साथ मिळणार आहे. या आव्हानांना स्वीकारल्यामुळे रावसाहेबांचा अहंकार दुखावला जाणार आहे. त्यामुळे ते घरातल्यांसमोर बाईच्या वेशात येणार आहे.
बाईच्या वेशात येऊन हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, खांद्यावर पदर असा त्यांचा वेश असणार आहे. त्यांच्या या वेशातील फोटो सुद्धा समोर आला आहे. शरद पोक्षेंना अशा वेशात पाहून चाहते सुद्धा मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
pune : ट्रकच्या धडकेत संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नी आणि चिमुकल्याच्या मृत्यूमुळे पुणे हादरलं
shinde fadanvis government : कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा धक्का, दिला ठाकरेंना दिलासा देणारा ‘हा’ मोठा निर्णय
udayanraje bhosle : राज्यपालांवर पांघरून घालणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? उदयनराजेंनी भाजप नेत्यांना जाहीर झापले