बिजवडी सोसायटीतील महाविकास आघाडी नवनिर्वाचित संचालकांच्या नागरी सत्कार सोहळ्यावेळी बोलत असताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी बिजवडी सोसायटीत झालेल्या पैशाच्या राजकारणावर भाष्य केले आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी, माणमधील हरित क्रांतीचं श्रेय प्रभाकर देशमुख यांचे असताना नेहमीच इतरांच्या कामाचं श्रेय घेणारे इथले आमदार या कामाचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करतात.
स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांच्या पाठा मऊ करण्याचं काम बिजवडीकर यापुढेही नक्की करतील अशी टोलेबाजी केली आहे. यामुद्दयावर सत्कार सोहळ्यात बोलत असताना, शरद पवार हे काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. शरद पवार यांच्यामुळे मंत्रीमंडळाचं बाशिंग बांधून बसलेल्यांवर टाळ्या वाजविण्याची वेळ आली असल्याची टोलेबाजी आमदार प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, माढ्याच्या खासदारकीच्या काळात शरद पवार यांनी माण-खटाव साठी १७५ कोटी मंजूर करुन दिले होते. त्यामुळे शरद पवारांवर आरोप करून फसवणूक करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. माण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्रयत्न करु.
यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांनी भाष्य केले. यावेळी साखळी सिमेंट बंधाऱ्याचा पहिला प्रयोग लोधवडेत प्रभाकर देशमुख यांनी राबविला. त्यांच्याच कल्पकतेतून तो संपुर्ण माणमध्ये राबवला गेला. शरद पवार यांच्या सावलीत सुध्दा उभं राहण्यांची ज्यांची लायकी नाही ते विचारतात शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल उपस्थित केला.
मध्यंतरी प्रभाकर देशमुख एका अपहरणाच्या घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी माण तालुक्यामधील दहिवडी शहरातील एका नगरसेवकाचे अपहरण केलेल्या अपहरणकर्त्यांचा छडा लावला होता. हा नगरसेवक अपक्ष असताना देखील प्रभाकर देशमुख त्याच्या मदतीला धावून गेले होते.
दरम्यान महाविकास आघाडी नवनिर्वाचित संचालकांच्या नागरी सत्कार सोहळ्यात अनेक प्रमुख पाहुण्यांनी आपली हजेरी लावली होती. यामध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, राष्ट्रवादीचे युवा नेते मनोज पोळ, माजी उपसभापती तानाजी कट्टे, सुनिल पोळ, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, विष्णूपंत अवघडे, बाबूराव काटकर, शिवाजीराव महानवर, जयप्रकाश कट्टेसह इतर मान्यवरांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
भैय्यु महाराजांच्या आत्महत्येच्या प्रकरणात भक्तांनी केली ‘ही’ मागणी, आरोपी हायकोर्टात
सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीचा पत्नीनेच काढला काटा, कारण समोर आल्यावर पोलिसही चक्रावले
६० वर्षांच्या पुरूषाने १० राज्यांमधील २७ उच्चपदस्थ महिलांसोबत केले लग्न, पोलिसही झाले अवाक
भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड ‘या’ मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, वाचून अवाक व्हाल






