Share

‘त्या’ निवडणूकीत शरद पवारांची चांगलीच दमछाक झाली होती; शहाजी पाटलांनी सांगीतला किस्सा

राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रणनीतीची चर्चा असते. शरद पवार राजकारणात एकदाही पराभूत झाले नाहीत. त्यात, शरद पवार आणि बारामतीचं नातं अत्यंत घट्ट आहे, असं म्हणतात. बारामतीवर पवार कुटुंबाचं राज्य आहे असे म्हणतात, मात्र आता हीच बारामती पवारांच्या हातातून काढून घेण्यासाठी भाजप मैदानात उतरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपने बारामतीवर लक्ष केलं आहे. पवार कुटुंबीयांचा बारामतीत पराभव करण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पवारांचा एका निवडणुकीत कसा दमछाक निघाला होता, याची आठवण करून देऊन भाजपच्या उत्साहाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार शहाजीबापू पाटील एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. संवाद साधताना शरद पवारांनाही कामाला लावणाऱ्या एका निवडणुकीवर भाष्य केलं. म्हणाले, राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता.

त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं सांगतानाच वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती. हे सुद्धा विसरता येणार नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

झाले असे होते की, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत शरद पवार एस काॅंग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी इंदीरा काॅंग्रेसचे उमेदवार होते शहाजीराजे काकडे. यावेळी शहाजीराजे काकडेंनी शरद पवारांना कडवी झुंज दिली होती. त्या निवडणूकीत शरद पवार केवळ १८ हजार मतांनी निवडून आले होते. याच निवडणूकीचा संदर्भ शहाजी पाटलांना द्यायचा असावा.

तसेच महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले, ठाकरे आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत. मुख्यमंत्री शिंदे असताना विकासकामे होत आहेत. तसेच ठाकरे गटाचे आमदार फुटणार असेही त्यांनी सांगितले.

म्हणाले, राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत. ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्याच्या वेळी शिंदे गटात येण्याची शक्यता आहे असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now