Share

‘पंतप्रधानांना दिग्दर्शकाच्या पायाशी लोळणं घ्यावं लागत असेल तर…’ ‘द काश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांचा खोचक टोला

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट राज्यात नवीन वादाचे कारण बनला आहे. या चित्रपटावरुन राजकिय वर्तुळात देखील टीकाटिपणी होताना दिसत आहे. अशा स्थितीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपट पाहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर टीका करत “जर तुम्ही काश्मीर फाईल्स बघण्याचं आवाहन करू लागले तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?” असा सवाल उपस्थित केला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आपली प्रतिक्रिया नोंदवताना, काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला आहे. त्यावर एक सिनेमा आला असून या सिनेमातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील हे पाहिलं गेल आहे. शिवाय समाजा-समाजात अंतर कसं वाढेल, द्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना, “जेव्हा समाजात द्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल. तर तो चित्रपट अतिशय चांगला आहे , बघितला पाहिजे, असं जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी? हे सगळे प्रश्न उपस्थित होतील” असे शरद पवार यांनी खंत व्यक्त करत म्हटले आहे.

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी टीका करत म्हटले होते की, 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून…”

तसेच चित्रपटाला करमुक्त करण्यात यावे या मागणीवरही केजरीवाल यांनी निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी, “ज्यांना वाटते चित्रपट करमुक्त करण्यात यावा त्यांनी थेट चित्रपट युट्युबवर अपलोड करावा म्हणजे जनतेला तो पाहता येईल” असा टोला भाजपच्या नेत्यांना लगावला होता. दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

आता पर्यंत या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाला हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशसह इतर राज्यांत करमुक्त करण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, काश्मीर फाईल्सनंतर आता गोधरा हत्याकांडवरती चित्रपट बनविण्याची विनंती नेटकऱ्यांनी विवेक अग्नीहोत्रींना केली आहे. परंतु सध्या विवेक अग्नीहोत्री ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरच वेब सिरीज आणण्याच्या विचारात आहेत.

महत्वाच्या बातम्या
पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांची गुजरातमध्ये झुंबड; इतक्या कमी दराने मिळतंय इंधन, जाणून घ्या किमती
आघाडीत चाललंय तरी काय? आमदारांना मोफत घरे देण्याबाबत शरद पवारांनीही मारला यू-टर्न; म्हणाले…
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने स्टेजवर जाऊन वाजवली कानशिलात, पहा व्हिडीओ
त्याच्या मिठीत मिळतो सपना चौधरीला ‘सुकून’ कोण आहे तो?

ताज्या बातम्या बाॅलीवुड राजकारण

Join WhatsApp

Join Now