sharad pawar statement on election committee | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. तसेच त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते शिंदे गटात गेले आहे. तसेच १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त नेते असल्यामुळे त्यांनी आपण खरी शिवसेना असल्यादा दावा एकनाथ शिंदे करत आहे.
हा वाद निवडणूक आयोगात पोहचला असून यावर निवडणूक आयोगच निर्णय घेणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर अनेक दिग्गज नेतेही मोठे वक्तव्य करताना दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे.
सध्या तरी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार हे नागपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी हे एक सुचक विधान केले आहे.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की. याबाबत मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंबंधीचा निर्णय घेईल आणि निकाल देईल. शेवटी निवडणूक आयोगाने दिलेला निकाल कोणत्याही राजकीय पक्षाला मानावा लागेल.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असे म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. शिंदे गटाने आधी ७ लाख शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी २८० पैकी २०० जणांच्या कार्यकारिणी सदस्यांचे शपथपत्रे सादर केली होती. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला होता. ते पक्षाचे सदस्य नाहीये. त्यांनी ४० आमदारांना घेऊन पक्षाविरोधी कारवाया केल्या होत्या. त्यामुळे ते चिन्हावर दावा कसे करु शकतात, असे ठाकरे गटाच्या वकीलांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
nashik : ‘चला, नाशिक आलंय…’ कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला अन् होत्याच नव्हतं झालं, बसमालकाने सांगीतला अपघाताचा थरारक घटनाक्रम
bjp : ‘तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार’ PFI ची राज्यातील बड्या भाजप नेत्याला धमकी; महाराष्ट्र हादरला
Uddhav Thackeray : लोकशाहीत विरोध ठिक पण कुणाच्या घरापर्यंत, नातवापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी ठाकरेंना झाप झाप झापले