राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेल्या घटनेचे राज्याच्या राजकारणावर जोरदार पडसाद उमटत आहे. संपकऱ्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला.
तर दुसरीकडे पवारांच्या घरावर हल्ला केल्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांबद्दल सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आज यावर खुद्द शरद पवारांनी भाष्य केले आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांना मी दोष देणार नाही, ते कामगार आहेत,’ असे खुद्द शरद पवार म्हणाले. पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील, त्या मागण्यांसाठी ते महिनोन महिने आंदोलनाला बसले, मात्र त्यांना चुकीचं नेतृत्व मिळालं, असे पवारांनी स्पष्टच सांगितले. कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मनात काहीतरी भरवल्याचा आरोप पवारांनी केला.
पवार म्हणाले, ‘प्रश्न राज्य सरकारकडे, एसटी महामंडळाच्या निर्णयक्षम अधिकाऱ्यांचा होता, पण त्यांचा उल्लेख न करता माझं नाव घेऊन टीका-टिप्पणी करून कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मनात काहीतरी भरवलं गेलं, त्याचा हा परिणाम आहे, त्यांना दोष न देता त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या घटकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पवारांनी केली.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी पवारांना ‘मुख्यमंत्री ‘वर्षा’तून बाहेर पडत नाही, या आरोपावर विचारले असताना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ‘मी अनेक राज्यांत बघतो की मुख्यमंत्री अनेकदा घरी बसून निर्णय घेतात, घरी दुसरं कार्यालय असतं, आपल्याकडे वर्षावर तसं आहे, असे पवार म्हणाले.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले-नाही आले यामुळे राज्याचा कारभार थांबलेला नाहीये. त्यांच्याकडे ज्या फाईल्स जातात त्यावर वेळेवर निर्णय होतात. त्यांच्या आरोग्याचे काही प्रश्न होते. ते कमी झाले असून आता मुख्यमंत्री मंत्रालयात आले याचा मला आनंद असल्याचं शरद पवारांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
इतर लोकांना जर मशिदींवरील भोंग्यांचा त्रास होत असेल, तर…; मौलाना रशीद अब्दुल यांचे मोठे वक्तव्य
“राजसाहेबांचं भाषण म्हणजे…”, अभिनेते शरद पोंक्षेंची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ
‘ ‘या’ तिघांचा गेम शरद पवारांनीच केला’; राज ठाकरे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
IPL मधील ‘या’ गोष्टीवर दिनेश कार्तिकने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला, ‘हा’ तर सगळ्यात मोठा मुर्खपणा