सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. तर आता विधान परिषदेसाठी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. तर अशातच नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै मतदान पार पडणार आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रपतिपदाच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून पवारांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे युपीएतील बऱ्याच पक्षांनी पवार यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे.
यावर आता पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना राष्ट्रपती निवडणुकीबाबत स्वत: शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून या निवडणुकीत उमेदवार होणार नाही,’ असं शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षांममध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले असल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. एक सल्ला देखील सोनिया गांधी यांनी पवारांना दिला असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार जर विरोधी पक्षाचे उमेदवार होणार असतील, सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. त्यामुळे विरोधी पक्षाची वाट आणखी सोपी होईल, असा सल्ला सोनिया गांधी यांनी शरद पवारांना दिला असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नाद खुळा! सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या जॉब लाथ मारत पाळली गाढवं; आता कमवतोय लाखो रुपये
अनुपम खेर वडील का होऊ शकले नाहीत? पत्नी किरण खेर यांचा मोठा खुलासा
सापासारखे सरपटणारे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात; वैज्ञानिकांनी दिला ‘हा’ इशारा
‘या’ IPS ने संजय दत्तला सगळ्यांसमोर चोपला होता; वाचा त्यांनी स्वत:च सांगीतलेला थरारक किस्सा