Share

“शरद पवार पावसात भिजल्याने लोकांची मने विरघळली, मात्र आता त्यांनी दिलेली आश्वासनेही विरघळली”

महाराष्ट्र्रातील नगरपंचायत आणि नागरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

“शरद पवार पावसात भिजले त्यांच्या भिजण्याने लोकांची मनं विरघळली आणि त्यांनी राष्ट्रवादीला सत्ता दिली, मात्र त्यांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने देखील विरघळली आहेत. त्याचा जाब स्वाभिमानी शेतकरी संघटना विचारणार आहे”, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडले आहे.

“महाविकास आघाडीने हुरळून जायचे कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत साधारण राज्यात ज्यांचं सरकार असतं त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही”, असा टोला राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांना लगावला आहे.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही आठवण करून दिली आहे. “महाविकास आघाडी स्थापन करताना शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते. आता त्यांनी याबाबत त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करावं”, असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे.

‘केंद्र आणि राज्य सरकार सारखेच आहे. रस्ते तसेच मोठ्या प्रकल्पांना शेतजमिनी लागतात. या शेतजमिनींची नुकसान भरपाई मोठी असेल, तर प्रकल्पाची किंमत वाढते. त्यासाठी केंद्र सरकारच्या सांगण्यावरून राज्य सरकार कायद्यात बदल करत आहे’, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.,

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी मिळवलेल्या विजयावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, रोहितचे अभिनंदन, सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी पण रोहितचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद , क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांच्या विजयावर त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मंदिरातून बाहेर पडताना गुलशन कुमार यांच्यावर झाडल्या गोळ्या, ‘या’ ठिकाणी रचला होता हत्येचा कट
अर्थसंकल्प सादर होण्यापुर्वी टाटांच्या ‘या’ स्टॉकमध्ये गुंतवा पैसै, मिळणार बक्कळ परतावा
नारायण मुर्तींचा जावई होणार ब्रिटनचा पंतप्रधान? एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनवर एक भारतीय राज्य करणार

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now