Share

‘ ‘या’ तिघांचा गेम शरद पवारांनीच केला’; राज ठाकरे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पवारांनी पंतप्रधानांना भेटून तिघांचा गेम केला असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, कोहिनूर मिलच्या व्यवहारात माझे नाव आले, त्यातून मी बाहेर पडलो. नंतर ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवार यांनाही नोटीस येणार याची चाहूल लागली होती. त्यानंतर त्यांनी किती नाटक केलं, असे राज ठाकरेंनी सांगत पवारांवर गंभीर आरोप केले.

म्हणाले, एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होत नाही. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे परत मोदींना भेटले, आणि मलिक मध्ये गेले.

आता नुकतेच शरद पवार हे संजय राऊत यांना भेटले. संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही, असे म्हणत राज यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच म्हणाले, शरद पवार जेव्हा भाषण करतात, तेव्हा ते फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. पण ते कधीही शिवरायांचा महाराष्ट्र असे म्हणत नाहीत.

याचे कारण काय? याचे कारण मुस्लिम मते जातील, ही भीती त्यांना वाटते. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहेच. हे मान्यच आहे. मात्र, मला त्यांना हे सांगायचे आहे की, फुले, शाहू, आंबेकरांच्याआधी हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. त्यांनी शिवरायांच नाव घेतलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे. असा आरोप त्यांनी शरद पवारांवर केला.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now