Share

sharad pawar : आरक्षण-आरक्षण बस्स झालं! यापुढे..; शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा

sharad pawar

sharad pawar on reservation  | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवासाठी सुद्धा हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी भाषण करत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी आरक्षणावरही वक्तव्य केलं आहे.

संभाजी ब्रिगेडला २५ वर्षे पुर्ण झाली. आपण संभाजी ब्रिगेडचा रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. प्रवीण गायकवाड यांनी संघटना हातात घेतल्यानंतर त्यांनी संघटनेचा विस्तार वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या. त्यांनी नव्या पिढीची शक्ती पक्षाभोवती उभी केली, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच  प्रवीण गायकवाड यांनी हे सर्व करत असताना संघटना म्हणून आज कोणत्या रस्त्याने जायला हवं याची खबरदारीही त्यांनी घेतली. याचा मला मनापासून आनंद आहे, असेही शरद पवारांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडने आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. पण आता आरक्षण-आरक्षण बस झालं. जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही. तोपर्यंत समजातील त्यांचं स्थान बदलणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. आरक्षणाकडून अर्थकारणाकडे या विषयावर बोलताना त्यांनी असे म्हटले आहे.

तसेच आज फक्त मराठा बोललं तरी वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काही लोक वेगळ्या दृष्टीने चर्चा करतात. मराठा म्हणजे मराठी लढाऊ माणूस असं चित्र आहे. समाजाची उन्नती होण्याकडेच मराठा समाजाचे लक्ष असते.  मराठा समाजाची उन्नती कशी होईल? याचाच विचार मराठा करत असतो, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
nashik : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरेंनाही मोठा धक्का, थेट बालेकिल्ल्यालाच लावले सुरुंग
nilesh rane : राणेंना नियम कायदे कळत नाहीत; स्वतः निलेश राणेच असं का म्हणाले? वाचा…
सलमान खानला स्टार बनवणाऱ्या बाॅलीवूड हस्तीचे अकाली निधन; १५ दिवसांपासून होते व्हेंटीलेटरवर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now