राजकीय वातावरण तापलेलं असतानाच त्यात आता अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोस्टने आणखी भर पडली आहे. कायम चर्चेत असणारी केतकी चितळे आता पुन्हा अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकीने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, सध्या तिच्या या फेसबुक पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
अशातच आता केतकीच्या अडचणींमद्धे वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते.
हे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकच्या एका तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निखिल भामरे असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. निखिल भामरे या तरुणाने शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. ते ट्विट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.
दरम्यान, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पवारांविरोधात ट्विट केल्याबद्दल या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. आणि यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1524972891657252865?s=20&t=VJUeJOXfN9NWBLG1FXEawg
वाचा आव्हाड यांनी काय केलं आहे ट्विट.. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’ असा मजकूर लिहिलेला आहे. तर आव्हाड यांनी याबाबत भाष्य करताना म्हंटलं आहे की, ‘काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा.’
महत्त्वाच्या बातम्या
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…
“पवार साहेब पाकिस्तानात तुमचं स्वागत केलं कारण त्यांना त्यांची माणसं बरोबर कळतात”
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शामीने सुनावले, ‘थोडं थांबा, नुसता वेग कामाचा नाही..
आईच्या तोंडातून शब्द फुटेना, बापाला कोसळले रडू, राहुलच्या आठवणीने कुटुंब भावूक