महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप सत्ताधारी पक्षांवर सातत्याने टीका करत आहे. भाजप नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये वाद सुरु आहे. त्यावर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रतिक्रिया देत असतात, त्यामुळे ते चर्चेत येत असतात. पण आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. (sharad pawar mumbai airport photo viral)
शरद पवार यांचा साधेपणा आणि त्यांची सामाजिक जाणीव हे अनेकदा दिसून आलेली आहे. आता अशाच एका गोष्टीमुळे शरद पवार चर्चेत आले आहे. राजकीय नेते त्यांच्या VVIP ट्रीटमेंटमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. तसेच त्यांच्यामुळे अनेकदा विमानांची उड्डणे थांबल्याच्या बातम्याही समोर येत असतात. पण सर्वच राजकारणीसारखे नसतात.
काही राजकारणी हे अनेक वर्षे राजकारण करुनही आणि पद, प्रतिष्ठा मिळूनही साधेपणाने जगत असतात. त्यातलेच एक नाव म्हणजे शरद पवार. यावेळी ते विमानतळावर विमानात प्रवेश करण्यासाठी सामान्य नागरिकांच्या लाईनमध्ये उभे होते, त्यामुळे ते चर्चेत आले आहे.
शरद पवार हे या वयातही राज्यभर दौरे करत असतात. तसेच गावोगावी फिरुन सामान्य जनतेशी संवाद साधत असतात. अशातच ते एका दौऱ्यावर जाण्यासाठी ते मुंबई विमानतळावर दिसून आले आहे. मुंबईच्या विमानतळावर शरद पवार VIP ट्रीटमेंटला बाजूला सारून सामान्यांप्रमाणे रांगेत उभे दिसून आले.
शरद पवार यांचे वय ८० च्या पुढे गेले आहे. तसेच ते कॅन्सर सारख्या आजारातून सावरलेले आहे. अशात त्यांना अशा अवस्थेत बघून अनेकजण हैराण झाले आहे. त्यांचा हा रांगेत उभा असलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. पण ते सर्व अडचणींना सामोरे जाताना दिसून येतात. यावेळी त्यांना VIP असल्याचे सांगत लाभ घेता आला असता, पण त्यांनी सर्व सामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहूनच विमानात प्रवेश केला. हे विमान मुंबईहून दिल्लीला निघाले होते.
महत्वाच्या बातम्या-
‘चित्रपटात काम मिळावं म्हणून काळी जादू करायचे’, बॉलिवूड अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा
ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्याच बेडखाली राहायचा तरुण; ‘अशी’ झाली पोलखोल
“रोहित शर्मा… जा वडापाव खाऊन ये” सोशल मीडियावर मीम्सचा धुराळा, चाहते का संतापले?