sharad pawar : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षाचे पक्षश्रेष्ठी जोमाने कामाला लागले असून महाराष्ट्रात दौरे करतं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली.
त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात राजकीय समीकरण बदलेल पाहायला मिळतं आहे. शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला देखील विरोधी बाकावर बसावे लागले आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येतं आहे. आज वेगवेगळ्या पक्षांचे तीन दिग्गज नेते एकाच टेबलावर एकत्र येणार आहेत. अजित पवार देखील या बैठकीला असणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे बंडखोर गटाचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे रात्रीच्या जेवणासाठी भेटणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
तसेच याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, हे तिन्हीही मोठे नेते मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये डिनर करणार आहेत. याबाबत फडणवीस यांच्या सहकाऱ्याने सांगितले की, मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक अत्यंत प्रतिष्ठित संघटना आहे आणि फडणवीस आणि पवार यांचा डिनर प्लान हा एमसीएशीच संबंधित आहे.
या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. विशेष बाब म्हणजे, या बैठकीत फक्त मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित विषयांवरच चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया सध्या उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळातून अद्याप या भेटीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…