यासर्व राजकीय घडामोडींवर मात्र राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणतीही ठोक भूमिका घेतली नसल्याच दिसून आलं. अख्खं महाविकास आघाडी सत्तेतून गेलं मात्र शरद पवार हे शांतच होते. कोणतेही मोठं व्यक्तव्य शरद पवारांनी केलं नाही.
मात्र आता विरोधकांच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच शरद पवार यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात जातीने लक्ष घातले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शरद पवार हे जातीने कामाला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी स्वत: चर्चा करणार आहेत.
विशेष बाब म्हणजे बाब म्हणजे शरद पवार याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून करणार आहे. शरद पवारांनी शिंदे सरकारला चारी मुंड्या चीत करण्यासाठी मास्टर प्लान आखलेला दिसत आहे. यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आज शरद पवार हे ठाणे दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी शरद पवार पोहोचले असल्याची देखील माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.