आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. परंतु ही सुरुवातच वादळी ठरली आहे. अधिवेशनाला सुरुवात होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यामुळे कोश्यारींनी लगेच तेथून काढता पाय घेतला.
त्यांनतर राज्यपाल राष्ट्रगीत मध्येच सोडून गेल्यामुळे त्याचा निषेध नोंदवत विधानपरिषद आमदार संजय दौड यांनी थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केले. त्यांच्या या कृतीमुळे विधीमंडळातील वातावरण आणखीन तापले. आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर विधीमंडळात राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र हे राष्ट्रगीत संपण्यापुर्वीच राज्यपाल तेथून निघून गेले.
त्यामुळे राज्यपालांनी राज्याचा अपमान केल्याचा निषेध नोंदवत संजय दौंड यांनी खाली डोकं वर पाय केले. बराच काळ ते तसेच उभे होते. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आहेत. त्यांचा आमदारकीचा प्रवास सुध्दा चांगलाच रंजक आहे. काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे सुपुत्र म्हणून संजय दौंड यांची ओळख आहे.
पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने राजकीय ऋणानुबंध चांगले आहेत. यात संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जबाबदारी पाहिली होती. सांगण्यात येते की, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती.
या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे संजय दौंड आणि भाजपकडून राजन तेली उभे राहिले होते. मुख्य म्हणजे धनंजय मुंडे यांना विजयी करण्यासाठी पंडितराव दौंड यांनी सर्वबाजूंनी प्रयत्न केले होते. म्हणजेच धनंजय मुंडे यांना विजयी करण्यामध्ये पंडितराव दौंड यांचा मोठा हात होता.
त्यामुळे या गोष्टीची परतफेड करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूकीत संजय दौंड यांना संधी देण्याचा शब्द पंडितराव यांना दिला होता. त्यावेळी संजय दौंड काँग्रेसमध्ये असताना देखील विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. याचकारणाने संजय दौंड यांना तिकीट देण्यात आले.
विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचे बळ होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होता. त्यामुळे भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आजवर संजय दौंड राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले आहे. आज विधीमंडळात झालेल्या गोंधळामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. परंतु त्यांच्याविषयीचा हा किस्सा खूप कमी लोकांना माहित आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मी लोकांना सांगू शकत नाही की कोणत्या परिस्थितीतून जातोय’, विराटचे खळबळजनक वक्तव्य
मोठी बातमी! ‘या’ दोन शहरांत मांस आणि मद्यपानावर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
तारक मेहता फेम नट्टू काकांची शेवटची इच्छा ऐकून मुलालाही बसला होता धक्का
“सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं तेच पिल्लू आता वळवळ करत आमच्यावर फुत्कारतय”