राजकीय वातावरण तापलेलं असतानाच गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque Controversy) वाद चांगलाच उफाळून आला आहे. याच प्रकरणी वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं.
काही हिंदू संघटनांनी या ठिकाणी शिव मंदिर असल्याचा दावा करत वाराणसी न्यायालयात धाव घेत सर्वेक्षण करण्याची मागणी केली. त्याचा अहवालही आता न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुस्लिम संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. परंतु, या प्रकरणात दखल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत असतानाच केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रकरणाचा दाखला देत शरद पवारांनी थेट भाजपला जहरी शब्दात लक्ष केलं आहे.
‘अयोध्या प्रकरण निकाली निघाल्यानंतर देशात शांतता नांदेल, असे आम्हाला वाटत होते. पण भाजपची विचारसरणी वेगळी आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारच्या धार्मिक विषयांना हवा देऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप पवारांनी केला.
दरम्यान, “वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे,” आहेत. मागील ३००-४०० वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टच बोलले. पवार म्हणतात, ‘वाराणसीत मंदिराला कोणाचा विरोध नाहीय. मात्र मंदिराजवळ एक मशीद आहे. याच मशिदीच्या मुद्द्यावरुन देशामध्ये सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचा कट रचला जातोय.’
तसेच ‘देशामध्ये बदल घडवून आणण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर झालं पाहिजे असं राष्ट्रवादीचं म्हणणं असल्याच पवारांनी बोलून दाखवलं आहे. तरुणांना रोजगार मिळावा अशी आमची भूमिका आहे, हेच काम आमच्या सर्व सहकाऱ्यांनी करण्याची गरज असल्याच त्यांनी बोलून दाखवलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ट्रेकींगसाठी लोणावळ्यात गेलेल्या तरूणाचा मृतदेह जंगलात सापडला; शोधणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करताच केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले…
शेणाचा अनोखा फायदा! ओडिशातील गृहिणीने सुरू केला शेणापासून ‘हा’ व्यवसाय, कमावते बक्कळ पैसा