Share

Sharad pawar : ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी केली भाजप आणि शिंदे गटासोबत युती, समोर आली मोठी माहिती

sharad pawar uddhav thackeray bjp

sharad pawar ashish shelar in mumbai cricekt association  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना म्हणत चिन्हावर दावा ठोकला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आधी सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. पण त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही धक्का बसला होता.

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीपुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गटांना वेगळे नाव आणि चिन्ह घ्यावे लागणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांचे मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे असणार आहे.

अंधेरीच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. पण राजकीय वर्तुळाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट भाजपचे आशिष शेलार यांच्याशीच युती केली आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत युती केली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्य़क्षपदाची निवडणूक २० ऑक्टोबरला होणार आहे. राजकीय निवडणूकीत विरोधक असणारे आशिष शेलार आणि शरद पवार यांनी मात्र या निवडणूकीत युती केली आहे. ते संयुक्त पॅनेल घेऊन या निवडणूकीत उतरणार आहे.

आधी आशिष शेलार आणि शरद पवार हे दोघेही वेगवेगळे उतरणार होते. पण आता त्यांनी एकत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणूकीत आशिष शेलार आणि शरद पवारांच्या पॅनेलमध्ये भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी असे एकत्र येणार आहे.

या निवडणूकीत आशिष शेलार हे अध्यक्षपदाची तर अमोल काळे हे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. तर सचिव पदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असून संयुक्त सचिव दीपक पाटील, तर खजिनदापदासाठी अरमान मलिकांनी ही उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या निडणूकीत नक्की काय होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तसेच कार्यकारिणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले यांच्यासह ९ जण असणार आहे. तसेच संदीप पाटील हे त्यांच्याविरोधात लढताना दिसून येणार आहे. आपण माघार घेणार नसल्याचे संदीप पाटील यांनी म्हटले आहे. तब्बल ११ वर्षानंतर क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेता अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shivsena : मशाल चिन्हानेच शिवसेनेला पहिला खासदार दिला होता, वाचा ‘तो’ १९८९ चा भन्नाट किस्सा
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ पुन्हा पेटवणार विजयाची ज्वाला; पहा काय आहे शिवसेनेचा इतिहास
Shinde group : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव नाकारले, शिंदेंना मात्र दिले, आयोगाने दोन्ही गटांना दिली ‘ही’ नावे

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now