आपल्या स्वरांनी देशावासियांनाच नव्हे तर सातासमुद्रापलिकडील रसिकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काल जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा, युगाचा अस्त झाला. लतादीदींच्या निधनाने भारतीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर शिवाजी पार्क येथे दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, अन्य मान्यवरांनी दर्शन घेतले.
याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांची लेक खासदार सुप्रिया सुळे यांच्या नात्यातील जिव्हाळाचं दर्शन झालं. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार यांनी पायातले बूट खालीच काढले होते. यानंतर ते खाली उतरल्यावर लगेच सुप्रिया सुळे त्यांचे बूट घेऊन त्यांच्याजवळ पोहोचल्या आणि त्यांनी वडिलांच्या पायात बूट घातले.
तसेच यावेळी समोरच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमे-यात कैद झालं झालं आहे. या प्रसंगावरून बापलेकीचं नातं असं असावं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अक्षय कुमारपासून ते भूमी पेडणेकर, निमृत कौर, विशाल ददलानी, दिया मिर्झा आणि हंसल मेहतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लताजींना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लताजींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
तसेच सरकारला मान्यवरांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी आणि ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेच्या नेत्याने भर सभेत राणेंना डिवचलं; म्हणाला, ‘नारायण राणेंच्या दुसऱ्या मुलाला हिसका दाखवला’
अघोरी कृत्य! बापाने मुलीवर अनेकदा केला बलात्कार; खुलाश्यात समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती
अखेरच्या क्षणी लता मंगेशकरांची अवस्था नेमकी कशी होती? वाचा व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागील सत्य
JIOच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: दोन दिवस सेवा ठप्प झाल्याने कंपनी ग्राहकांना देणार ‘हे’ मोठे गिफ्ट