sharad pawar : तुमचा पत्राचाळ प्रकरणात सहभाग आहे का? पवारांनी स्पष्टच सांगितलं, आरोप खोटे निघाले तर..

sharad pawar : सध्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे तुरुंगात आहेत. संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बैठक घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर आता खुद्द शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

आज खुद्द शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपने केलेले आरोप खोडून काढले. मंगळवारी पत्राचाळ प्रकरणामध्ये शरद पवार यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली. त्यानंतर भाजपने ही मागणी धरून ठेवली.

याबाबत आज बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ईडीचे आरोपपत्र व २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही माझी चौकशी करावी. मात्र चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे थेट आव्हान पवार यांनी केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पत्राचाळ प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप केले आहे. कृषिमंत्री असताना संजय राऊत यांच्यासोबत बैठक घेतली होती, त्याबद्दल आधार काय आहे. तो मला हवा आहे.’ माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य नसेल तर आरोप करणाऱ्यांसंबंधी राज्य सरकारची काय भूमिका असेल हे आधी स्पष्ट करा”, असं पवार म्हणाले.

दरम्यान, या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. शरद पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत १० ते २० हजार बैठका घेतल्या आहेत. राज्यात असा एकही प्रकल्प नाही, ज्यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतलेली नाही.

‘शरद पवार यांना बैठका घेणं नवं नाही. शरद पवार यांनी १४ ऑगस्ट २००६ रोजी एक बैठक घेतली होती. गृहनिर्माण खात्याशी संबंधित असलेले नेते या बैठकीला उपस्थित होते. पत्रा चाळचा प्रकल्प १९८८ पासून रखडलेला होता, असे आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी 
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!