sharad koli : यंदाचा दसरा मेळाव्याला चांगलाच राजकीय वळण मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यामुळे यंदा शिवतीर्थावर कोणाचा दसरा मेळावा होणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
तिकडे वाद न्यायालयात दसरा मेळाव्याचा गेला असताना शिवतीर्थावर मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळू नये, यासाठी दोन्ही गटाकडून एकमेकांना शह दिला जात आहे. यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे.
अशातच युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार असल्याची माहिती शरद कोळी यांनी दिली आहे. यामुळे आता आणखीनच वातावरण तापलं आहे.
पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले, उद्धव सेना ही दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी कायदा हातात घेतला तरी काही हरकत नाही, असं कोळी यावेळी बोलताना स्पष्टच बोलले. तसेच दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महाभारत घडेल, असं कोळी यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोळींनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिलं होतं. कोळींनी म्हंटलं होतं की, ‘समजा या चाळीस गद्दारांनी कायदा आणि सत्तेचा गैरवापर करुन शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ, फावडे घेऊन शिवसैनिक शिवतीर्थ मैदान उखडून टाकतील, असा इशाराच कोळींनी शिंदे गटाला दिला होता.
‘शिवसैनिकांनी आजतागायत खूप सहन केले. पण, आता सहन करणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असा इशारा कोळी यांनी शिंदे गटाला दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाडे फोडू, अशी आक्रमक भूमिका कोळी यांनी घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!
politics : ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच एक नंबर! पवारांनी थेट आकडेच सांगितले, भाजपचा दावा काढला खोडून
Raju Srivastava : कार्डियाक अरेस्टमुळे गेला राजू श्रीवास्तव यांचा जीव, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष