sharad koli speech ban | उद्धव ठाकरे यांच्या गटाची महाप्रबोधन यात्रा सुरु होती. त्या यात्रेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना नेते शरद कोळी हे विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसून येत होते. त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला होता. तसेच अनेक वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केली होती. ते आता त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
आता प्रक्षोभक भाषणामुळे शरद कोळी यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांच्यावर बंदी घातली आहे. शरद कोळी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तसेच भाषणावर बंदी घालण्यात आल्यानंतर पोलिस नोटीस देण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोणषाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या हॉटेलमध्ये पोलिस आले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतापलेले दिसले. तसेच त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धरणगावमध्ये महाप्रबोधन यात्रा पार पडली होती. यात शरद कोळी यांनी शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह आणि खालच्या स्तराचे वक्तव्य करत टीका केली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
तसेच गुजर समाजबांधवामध्येही अतिशय संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी शरद कोळी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पोलिस अधिक्षक राजकुमार यांना देण्यात आले होते. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांच्या भाषणावर बंदी घालत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्याठिकाणी थांबले होते. त्याठिकाणी पोलिस दाखल झाले होते. तसेच भाषणावर बंदी का घालण्यात आली? हेही त्यांनी सांगितले आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Marathi Movie : माती खाल्ली! मराठी कलाकार नाही दिसले का? शिवरायांची भूमिका अक्षयकुमारला दिल्याने लोकं संतापले
supriya sule : ‘मुकाट्याने ऐक नाहीतर आमच्या हातात दंडा’; संभाजी भिडेंच्या कुंकवाच्या वक्तव्याचा वाद चिघळला
Rahul Dravid: त्याने बुमराहची कमतरता भासू दिली नाही, राहुल द्रविडने ‘या’ गोलंदाजाला सांगितले भारताचे भविष्य