Share

sharad koli : शहाजीबापूंना विधानपरिषदेची स्वप्नं, दोनशे कोंबड्या देतो, अंडी काढा; युवासेनेने लायकीच काढली

shhaji bapu patil

sharad koli : शिंदे गटातील नेते मंडळी सध्या चांगलेच राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून नेते मंडळी महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं सांगत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. याचाच धागा पकडत आता युवा सेनेच्या नेत्याने शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार प्रतीहल्ला चढवला आहे. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेल्याच पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी शहाजी बापू यांनी माध्यमांशी बोलताना सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करण्याची मागणी बोलून दाखवली होती. यासोबतच विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं देखील बापू यांनी म्हंटलं होतं.

त्यावर आता युवा सेनेकडून प्रत्युत्तर दिलं आहे. युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी शहाजी बापूंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मी त्यांना शंभर-दोनशे कोंबड्या आणून देतो, त्यांनी अंडी काढण्याचं काम करावं,’ असं म्हणत शरद कोळी शहाजी बापूंवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना शरद कोळी यांनी म्हंटलं आहे की, शहाजी बापू पाटील यांना आता दिवसा स्वप्नं पडू लागली आहेत. शहाजी बापू पाटील यांना शिवसैनिक आता सोडणार नाहीत. म्हणून त्यांनी पर्यायी मार्ग सुचवला असून अभिजित पाटील यांना सांगोला मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली असल्याच कोळी यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now