Share

‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..

sharad kelkar fears about bollywood

मराठमोळा अभिनेता शरद केळकर सिनेसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकेसाठी ओळखला जातो. शरदने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत मजल मारत आपली एक ओळख निर्माण केली आहे. आज बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये शरद दमदार भूमिका साकारल्याचे पाहायला मिळते. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना शरदने बॉलिवूडबद्दल एक भीती व्यक्त केली (sharad kelkar fears about bollywood) आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरदने दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बॉलिवूड चित्रपटांवर परिणाम होऊ शकण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याबद्दल बोलताना शरदने म्हटले की, ‘मला भीती वाटते की, दाक्षिणात्य चित्रपट बॉलीवूडवर भारी पडतील. आपण आपलं मुळ विसरत चाललो आहोत. आपण पूर्णपणे एका वेगळ्या झोनमध्ये आहोत. चित्रपटांसाठी वेगवेगळे विषय आहेत. पण लोकांना हिंदी चित्रपटांकडून बॉलीवूड मसाला चित्रपट अपेक्षित आहेत. आणि तसे मसाला चित्रपट बनत नाहीत’.

शरदने पुढे म्हटले की, ‘कोरोना काळापासून लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट आणि वेबसीरीज पाहत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळे काहीतरी नेहमी पाहण्याची अपेक्षा असते. त्यामुळे आपल्यालाही प्रेक्षकांना नाविण्यापूर्ण असा आशय द्यावा लागेल. जे जास्तीत जास्त लोकांना भावेल, त्यांचे भरपूर मनोरंजन करेल तसेच ज्याचा जास्तीत जास्त व्यवसाय होईल, असे चित्रपट काढावे लागतील’.

दरम्यान, शरद केळकरने दूरदर्शनवरील ‘आक्रोश’ या मालिकेद्वारे त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘सात फेरे’, ‘उतरन’, ‘एजंट राघव’ यासारख्या मालिकेत काम केले. मराठीसोबत त्याने अनेक हिंदी मालिकेतही काम केले. छोट्या पडद्यासोबत त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातही काम करत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. याशिवाय ‘द फॅमिली मॅन’, ‘रंगबाझ फिर से’, ‘स्पेशल OPS’, ‘द फॅमिली मॅन २’, ‘ब्लॅक विड्डो’ (Black Widows) या वेबसीरीजमध्येही त्याने काम केले.

शरदने मराठीत ‘उत्तरायण’, ‘चिनू’, ‘लय भारी’, ‘अ पेईंग गोस्ट’, ‘संघर्ष यात्रा’ यासारख्या चित्रपटात दिसला. तर हिंदीत ‘भूमी’, ‘गोलियों की रासलीला – रामलीला’, ‘तान्हाजी’, ‘भुज’ अशा चित्रपटातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय शरदने ‘बाहुबली’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला आहे. त्याच्या या डबिंग कौशल्यासाठीही त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: शुटींगनंतर कतरिना घेत आहे विक्की कौशलची काळजी, बेडरुममधील फोटो झाला व्हायरल
सारा-विक्कीच्या चित्रपटाच्या शुटींगमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, घडले असे काही की..
Bigg boss: तेजस्वीच्या ‘या’ भूमिकेने जिंकली चाहत्यांची मने, म्हणाले, ‘हाच दृष्टीकोण कायम ठेव’

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now