प्रसिद्ध गायक केके यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कुटुंब आणि मित्रपरिवारच नाही तर लाखो चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चाहत्यांना निराश केले नाही. केके यांचे ३१ मे रोजी निधन झाले.
कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केकेचा कोलकाता येथे 2 दिवसांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. 30 मे रोजी सादरीकरण केल्यानंतर 31 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत केके यांनी नजरल मंच येथे सादरीकरण केले.
यादरम्यान केके यांची प्रकृती खालावली होती. केके यांनी छातीत दुखणे आणि अस्वस्थतेची तक्रार केली होती. त्यानंतर अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले. अनेकांनी केकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी देखील आपल्या खास मित्रासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण सांगितली आहे.
शंकर महादेवन यांनी सांगितले आहे की, ‘त्याला सोशल मीडियाचीही पर्वा नव्हती आणि त्याहीपेक्षा त्याने व्हॉट्सअॅप कधीच वापरलं नाही. त्याच्याशी बोलायचं झालं तर थेट फोन करावा लागत. त्याच्या गाण्यांना किती लाईक्स मिळतात याची काळजीही त्याला कधीच नव्हती.’
पुढे बोलताना शंकर महादेवन म्हणाले की, ‘काही महिन्यांपूर्वी आम्ही एका टीव्ही शोमध्ये भेटलो होतो, आम्ही सर्व त्याला चिडवत होतो ‘तू बेंजामिन बटन सारखा आहेस, कारण तू म्हातारा होत आहेस’. ते अद्भुत क्षण कधीच विसरता येणार नाहीत,’ शंकर महादेवन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, केके यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केके यांना मंगळवारी लाईव्ह कॉन्सर्टनंतर अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित केलं. केके यांच्या मृत्यूनंतर देशभरातून अनेकांनी लोक श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या
‘रानबाजार’मधील भूमिकेविषयी प्राजक्ता माळीची पोस्ट तुफान व्हायरल; “आणि जो सीन माझ्या कारर्किदीतला…”
करण जोहरची जंगी पार्टी भोवली? बाॅलीवूडच्या तब्बल ५५ कलाकारांना करोनाची लागण
अशोकमामांचा दिलदारपणा पुन्हा आला समोर; गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
‘या’ शहरातून रचला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा प्लॅन; पोलिसांच्या हाती आले मोठे पुरावे, दोन जण ताब्यात