जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं आहे. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचा दुर्देवी निधन झालं. वयाच्या 52 व्या शेन वॉर्नने थायलंडमधल्या एक व्हिलात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शेन वॉर्न मृत्यूच्या आधी काय करत होता, याबद्द्ल धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूमुळे विविध शंका-कुशंका उपस्थित होत होत्या. विविध प्रश्न उपस्थित होत होते. मृत्यूच्या आधी तो काय करत होता याची चर्चा सर्वत्र होत होती. आता त्याच्या मृत्यूच्या आधी तो काय करत होता आणि कोणासोबत होता याची माहिती समोर आली आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वीच्या काही काळ अगोदरचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या फुटेजमधून शेन वॉर्नने मसाज करणाऱ्या महिलांना रिसॉर्टमध्ये बोलवलं असल्याचं दिसून येत आहे. महिलांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांवर रिसॉर्टमध्ये एन्ट्री केल्याची माहिती याद्वारे समोर आली आहे.
या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे की, घटनेच्या दिवशी एकूण चार महिला रिसॉर्टमध्ये आल्या, त्यातील दोन शेन वोर्न च्या रूममध्ये गेल्या तर 2 त्याच्या मित्रांच्या रूममध्ये गेल्या. त्यानंतर त्या , दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी रिसॉर्टमधून बाहेर निघाल्या. महिला गेल्यानंतर 2 तास 17 मिनिटांनी शेन वॉर्न त्याच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचं समोर आलं आहे. वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही.
15 वर्षांच्या करियरमध्ये शेन वॉर्ननी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. आजवरची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आकडेवारी आहे. 1999 मध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात शेन वॉर्न होते. 1993 ते 2005 या काळात 194 वनडे मॅचेसमध्ये त्यांनी 293 विकेट्स घेतल्या होत्या. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर 2013 पर्यंत शेन वॉर्न टी20 सामने खेळत होते.