Share

मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी

क्रिकेटविश्वाला सर्वात मोठा धक्का देत फिरकीपटू शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. शेन वॉर्नचा मृत्यू थायलंडमधील एका प्रश्स्त व्हिलामध्ये झाला आहे. त्यामुळे तो तिथे कसा गेला आणि का गेला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.

शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी त्याने थायलंडमधील इंफिनिटी पूलचे फोटो आपल्या इंटाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. या पुलाचे फोटो पाहूनच सर्वांच्या लक्षात येईल की तो एका आलीशान जागी गेला आहे. वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे नाव कोह सामुई असे आहे. ताडाच्या झाडांची गर्दी असणारे समुद्र किनारे आणि वर्षावन या बेटाची ओळख आहे.

असे म्हणले जाते की, ज्या व्यक्तींना शांतता हवी आहे. त्यांनी या बेटावर नक्की जावे. वॉर्नने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या बेटाचे सौंदर्य दिसत आहे. वॉर्नच्या मृत्यूपुर्वी तो याच ठिकाणी फिरायला गेला होता. परंतु त्याचे फिरणे शेवटचे ठरले.

फिरुन आल्यानंतर काही काळ वॉर्न विश्रांतीसाठी गेला होता. परंतु यादरम्यानच त्याला ह्रद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु वेळ निघून गेली. शेन वॉर्नच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

कलाविश्वापासून राजकिय आणि क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींनी ट्विट करत वॉर्नला श्रध्दांजली वाहिली आहे. सांगण्यात येत आहे की, काही दिवसांपासून शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई येथील निवासस्थानी त्याच्या मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी वॉर्नचा मित्र त्याला जेवणासाठी उठवायला गेला होता. परंतु तो उठला नाही.

यानंतर मित्राच्या लक्षात आले की, वॉर्न बेशुध्द पडला आहे. त्यामुळे मित्राने वॉर्नला शुध्दीत आणण्यासाठी त्याच्यावर सीपीआर केला. परंतु त्याचा ही काही परिणाम वॉर्नवर झाला नाही. यानंतर मित्राच्या लक्षात आले की, वॉर्नचा मृत्यू झाला आहे. मग वॉर्नला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची माहिती सर्वांना दिली.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के’, धर्मेंद्र यांनी फार्महाऊसमधील रंगीबेरंगी फुलांची दिली माहिती
उन्हाळ्यात पाण्यातूनच कमवा पाण्यासारखा पैसा; असा करा मिनरल वॉटरचा बिझनेस, कमवा करोडो
मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वाॅर्न शेवटच्या क्षणी त्या रहस्यमयी बेटावर काय करत होता? वाचा…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now