ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचे निधन झाले आहे. (shane warne pass away)
शेन त्याच्या घरी होता. तिथल्या लोकांनी बघितले की तो प्रतिसाद देत नाहीये. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचे निधन झाले असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला होता. शेन वॉर्न हा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स, तर एकदिवसीय सामन्यात २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
शेन वॉर्नने आपल्या खेळाने जगाला जितके प्रभावित केले आहे तितकेच त्याच्या वादांमुळेही तो चर्चेत असायचा. १९९८ मध्ये, वॉर्नला एका बुकीला माहिती दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता आणि २००३ च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर क्रिकेटमध्ये बंदी घालण्यात आली होती. जाणूनबुजून किंवा नकळत डोपिंगचा बळी ठरलेल्या वॉर्नला या कारणांमुळे चांगलाच फटका बसला होता.
मनगटाचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणार्या शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी कसोटीतून कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर १९९३ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. शेन वॉर्नने भारताच्या रवी शास्त्रींची पहिली विकेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
‘इतका राग होता उच्चवर्णिय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भुमिकेत अमिताभ कशाला?’ लेखिकेची जहरी टीका
आपल्याच आईसोबत पतीचे लग्न लावायला निघाली होती ‘ही’ अभिनेत्री, वयाच्या अंतराबद्दल म्हणाली..
लग्नानंतर 12 दिवसांतच शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले Mrs. akhtar, फोटोसुद्धा बदलला