ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्नच्या(Shane Warne) निधनामुळे क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सुरवातीला शेन वॉर्नचा मृत्यू ह्र्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. पण थायलंड पोलिसांनी सादर केलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.shane warne home cctv footage viral)
आता शेन वॉर्नच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यातून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्नने मसाज करण्यासाठी चार महिलांना बोलावले होते. हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी शेन वॉर्न त्या महिलांच्या संपर्कात होता. ही बाब समोर येताच खळबळ माजली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 1:53 वाजता चार महिला शेन वॉर्नच्या व्हिलामध्ये आल्या होत्या. या सर्व महिला दुपारी २.५८ वाजता रिसॉर्टमधून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर दोन तास 17 मिनिटांनंतर म्हणजेच संध्याकाळी 5:15 वाजता शेन वॉर्न पहिल्यांदा बेशुद्ध अवस्थेत खोलीत सापडल्याचे दिसून आले.
मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवला आहे. शेन वॉर्नच्या कुटूंबियांना देखील त्याच्या मृत्यूबाबत कुठलाही संशय नाही. थायलंडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त जनरल सुरचेत यांनी सांगितले की, “शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नाही. त्याच्या शरीरावर कुठल्याही खुणा नव्हत्या.
दरम्यान महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न सुट्टीवर जाण्यापूर्वी दोन आठवडे लिक्विड डायटवर होता. त्याच्या छातीत वेदना होत होत्या. तसेच त्याच्या अंगावर घाम देखील येत होता. त्याने आयुष्यभर सिगारेट ओढली. मला वाटतं त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा खुलासा शेन वॉर्नच्या मॅनेजरने केला आहे.
दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नवर मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्यामध्ये सुमारे एक लाख लोक जमतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जाहीर शोकसभेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. एमसीजी हे वॉर्नचे आवडते मैदान होते. याच मैदानावर १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटीत त्याने हॅट्ट्रिक घेतली होती.
महत्वाच्या बातम्या :-
टीम इंडियाचा स्टार खेळाडू करणार लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची ‘ही’ धाकड गर्ल?
मृत्यूपुर्वी मसाज करणाऱ्या महीलांसोबत होता शेन वाॅर्न; सीसीटिव्ही फुटेजमधून झाला वेगळाचा खुलासा
बलात्कार प्रकरणात आरोपी न करण्यासाठी 37 लाखांची मागितली लाच, पोलिसाला रंगेहाथ अटक, असा रचला सापळा






